मीशो ॲपमधून पैसे कसे कमवायचे? | How To Earn Money From Meesho App In Marathi.

मीशो सप्लायर कसे व्हावे माहिती मराठीमध्ये / How To Become Meesho Supplier Information In Marathi.

How To Earn Money From Meesho app ?

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट नंतर ऑनलाईन बिझनेस करायचा असेल तर मीशो अँपचे नाव सर्वप्रथम डोक्यात येते. कारण ही तसेच आहे मीशो या कंपनीचे मागच्या काही वर्षात ऑनलाइन बिजनेसमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळाली आहे. Meesho App आपल्याला एक संधी देते की 0 % कमिशनमध्ये मीशो सोबत जोडून तुम्ही तुमचा ऑनलाइन बिजनेस सुरु करू शकतात. मीशो सोबत तुम्ही कशाप्रकारे व्यवसाय सुरू करू शकतात ? त्या व्यवसाय मध्ये किती भांडवल लागेल ? मीशोसोबत ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता पडेल ? आजच्या पोस्टमध्ये आम्ही संपूर्ण मीशो अँप माहिती मराठीत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जर तुम्ही मीशो अँप बरोबर स्वतःच्या व्यवसायाला जोडून मीशो सेलर पार्टनर बनू इच्छित असाल तर आजची पोस्ट संपूर्ण नीट वाचा. कारण यामध्ये मीशो पार्टनर सेलर तुम्ही कसे बनू शकता ? आणि तुमचा ऑनलाईन व्यवसाय कश्या प्रकारे सुरु करू शकता या विषयी A to Z माहिती दिली आहे.

मीशो ॲपमधून पैसे कसे कमवायचे? / How To Earn Money From Meesho App In Marathi.

सगळ्यात पहिले मीशो पार्टनर सेलर बनण्यापूर्वी तुम्हाला तुमचे सेलिंग प्रोडक्ट काय असणार आहे हे ठरवणे खूप गरजेचे आहे. या पोस्टमध्ये सहा ते सात प्रश्नांद्वारे आम्ही माहिती देण्याचे काम केलेले आहे, त्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पोस्टमध्ये मिळणार आहेत.

मीशो सोबत व्यवसाय सुरू करण्यासाठी कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता पडेल ?

  1. सगळ्यात पहिले तुम्हाला त्या प्रॉडक्टची गरज असेल जे तुम्ही मीशोवर विक्री करू इच्छित आहेत.
  2. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर चांगले आहे.
  3. त्याशिवाय तुम्ही तुमचे सेलर अकाउंट तुमच्या मोबाईल वरून सुध्दा वापरू शकता परंतु तिथे तुम्हाला फॉन्ट लहान पाहायला मिळतील.काही दिवस तुम्हाला वैताग होऊ शकतो पण मोबाईल वरून तुम्ही व्यवसायाची सुरुवात करू शकतात.
  4. तुम्हाला एक बऱ्यापैकी चालणारे नवीन किंवा जुने प्रिंटर लागेल. या व्यवसायात खूप हायफाय प्रिंटरची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही.
  5. प्रॉडक्ट पॅक करायला तुम्हाला टेपची आवश्यकता पडणार आहे. लोकल टेप तुम्ही वापरू शकता किंवा ऑनलाइन ब्रँडेड टेप मागून तुम्ही वापरू शकता.
  6. याशिवाय काही किरकोळ गोष्टींची जसे की कात्री,कटर,पेन,मार्कर इत्यादींची तुम्हाला आवश्यकता पडणार आहे.

मीशो सोबत व्यवसाय सुरू करण्यासाठी किती जागेची आवश्यकता पडणार आहे ?

मित्रांनो तुम्हाला मीशो सोबत ऑनलाईन बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करायची काही गरज नाहीये. सुरुवातीला मीशो सोबत तुम्ही तुमचा व्यवसाय तुमच्या घरातून सुरु करू शकतात. जर तुमच्या घरामध्ये एक छोटीशी रूम असेल तर तिथे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट ठेवू शकतात आणि तिथूनच तुम्ही मीशो सोबत ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकतात.

तुमचे घर एक अशी जागा आहे जिथे तुमच्या शिवाय तुमचे घरचे तुमच्यासोबत काम करू शकतात, तुमची हेल्प करू शकतात. तुमचे घर तुमच्यासाठी सुरुवातीला व्यवसाय सुरू करत असताना बेस्ट ऑप्शन असणार आहे.

मीशो सोबत व्यवसाय सुरू करण्यासाठी जीएसटी नंबर कसा घ्यावा ?

जसं की तुम्हाला माहिती असेल की ही ई-कॉमर्स वेबसाईटवर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला जीएसटी नंबरची आवश्यकता पडते. जसे की ॲमेझॉन फ्लिपकार्ट मीशो अँप सगळीकडे जीएसटी नंबर कंपल्सरी आहे.

जेव्हा आपण बाहेरून GST नो काढत असतो तेव्हा खूप प्रॉब्लेम येत असतात, त्यामुळे मीशो अँपने सुविधा देते की तुम्ही मीशोमधून GST नंबर काढू शकतात. जेव्हा तुम्ही मीशोवर सेलर अकाउंट वर रजिस्टर करतात तेव्हा तिथे तुम्हाला GST नंबरचा ऑप्शन पाहायला मिळतो.

जर तुम्ही मीशो अँपमधून GST नंबरसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला 799 रुपये त्यांना pay करावे लागतात. जर तुम्ही बाहेरून जीएसटी नंबर काढायची सर्विस घेतली तर तुम्हाला एक हजार ते दीड हजार रुपये इतका खर्च येतो. हे तुमच्या मनावर आहे की तुम्हाला जीएसटी नंबर कुठून घ्यायचा आहे. misho ॲप मार्फत मागवलेला GST नंबर तुमच्याकडे तेवढ्याच वेळात येईल जेवढ्या वेळात तुम्ही बाहेरून GST नंबर मागवता.

मीशो अँपवर काय विकले पाहिजे ?

जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्याद्वारे बनवले गेलेले प्रॉडक्ट मीशो अँपवर विक्री करू शकतात किंवा मीशोवर असलेले प्रॉडक्टसुद्धा तुम्ही रिसेल करू शकतात. याशिवाय काही युनिक प्रोडक्ट जे मीशो अँपवर नाही आणि मार्केटमध्ये सहज उपलब्ध होत नाही ते प्रॉडक्ट तुम्ही या प्लॅटफॉर्म वर विकू शकता.

स्वतः बनवलेल्या प्रॉडक्टमध्ये तुम्ही उदा.स्वतः शिवलेले कपडे विकू शकता. जर तुमचे कोणत्या वस्तुचे शॉप आहे तर तुमचे शॉप तुम्ही ऑनलाईन आणू शकतात.या शिवाय खेळणी,पॅकेट,पर्स अश्या लहान गोष्टी सुद्धा मीशोवर सेल करुन चांगले प्रॉफिट कमवू शकतात.

मीशो अँपवर प्रॉडक्ट कसे सेल करावे ?

जेव्हा आपण मीशो अँपवर किंवा वेबसाईटवर visit करतो तेव्हा आपल्याला सेलरचा कोणताच ऑप्शन येत नाही. मीशो सोबत सप्लायर बनण्यासाठी तुम्हाला जावे लागेल https://supplier.meesho.com/ या वेबसाईटवर तुम्ही सेलरसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

स्वतःला सेलर म्हणून रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला येथे तुमचे प्रॉडक्ट रजिस्टर करावे लागेल. तुमचे प्रॉडक्ट लिस्टिंग केल्यानंतरच तुमची प्रॉडक्ट सेलिंगची प्रोसेस सुरू होते.

मीशो सेलर रजिस्ट्रेशनसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • पॅनकार्ड :- सगळ्यात पहिले तुमचे पॅनकार्ड असणे आवश्यक आहे, जे की जवळपास सगळ्यांकडे असते. जर तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून पॅन कार्ड मागवू शकता. दहा ते पंधरा दिवसात तुमच्या घरच्या पत्यावर पॅन कार्ड येऊन जाते.
  • आधारकार्ड :- पॅन कार्ड व्यतिरिक्त तुमचे आधार कार्ड असणे फार गरजेचे आहे.
  • GST नंबर :- जीएसटी नंबर तुम्ही मीशोमधून देखील मिळू शकता किंवा तुम्ही बाहेरून सुद्धा जीएसटी नंबर काढू शकता.
  • बँक अकाउंट नंबर :- तुम्हाला एक बँक अकाउंट नंबर लागेल त्यामध्ये तुमचे प्रॉडक्ट सेल झालेले पैसे येत राहतील. 0 % कमिशन मध्ये सारे प्रॉडक्ट सेल झालेले पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातात.
  • इतर : वरील महत्त्वाचा डॉक्युमेंट शिवाय तुमचा एक ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचा एक मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे, कारण यावर तुमचे ओटीपी येत असतात.

मीशोसोबत व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो ?

जर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून मीशोसोबत व्यवसाय सुरू करत असतांन तर तुम्हाला फक्त एक चांगला इंटरनेट पॅक तुमच्या मोबाईलवर टाकावा लागेल.

त्याशिवाय तुम्ही जे प्रॉडक्ट विकत घेणार आहे त्यासाठी तुम्हाला भांडवलाची आवश्यकता पडेल. जर तुम्ही स्वतः प्रॉडक्ट बनवत असाल व त्याला सेल करायचे असेल तर तुमच्या कच्या मालाचा खर्च तुम्हाला लागेल.

जर तुम्ही सुरुवातीला छोट्या प्रमाणात मीशोसोबत व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर किरकोळ खर्च व कच्च्या मालाचा खर्च धरून तुम्ही 40 ते 50 हजार रुपयात मीशोसोबत ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकतात.

मीशोसोबत व्यवसाय करत असताना प्रॉफिट मार्जिन किती मिळू शकते ?

जेवढ्या किमतीमध्ये तुम्ही प्रॉडक्ट विकत घेतात त्यावर तुम्हाला प्रॉफिट किती हवे आहे यानुसार तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची किंमत ठेवू शकतात.

जर तुम्ही एखादी वस्तू पाचशे रुपयाला विकत घेतली व मीशोवर आठशे रुपयाला ती वस्तू विकली तर तुम्हाला तीनशे रुपये प्रॉफिट होतो. हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची किंमत काय ठेवायची आहे व किती प्रॉफिट घ्यायचे आहे. मीशो तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देते की तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची किंमत किती ठेवू शकतात.

FAQ

मीशो ॲप काय आहे ?

उत्तर: Meesho हे एक भारतीय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. जे वापरकर्त्यांना Facebook, WhatsApp आणि Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून फॅशन, सौंदर्य, इलेक्ट्रॉनिक्स आणि खूप साऱ्या विविध श्रेणींमधील उत्पादने रिसेलिंग करण्यास अनुमती देते.

मी मीशोवर भारताबाहेर उत्पादने रिसेल करू शकतो का?

उत्तर :- नाही, Meesho फक्त भारतात उत्पादनांच्या पुनर्विक्रीला परवानगी देते.

मीशोवर किमान पेआउट रक्कम आहे का?

उत्तर : होय, मीशोवर किमान पेआउट रक्कम रु. 100 आहे. तुमच्याकडे किमान कमिशन शिल्लक रु. असणे आवश्यक आहे.

मी मीशो ॲपवरून पैसे कसे कमवू शकतो?

उत्तर: Meesho कडून पैसे कमवण्यासाठी, तुम्हाला प्लॅटफॉर्मवर पुनर्विक्रेता बनणे आवश्यक आहे. साइन अप केल्यानंतर आणि प्रोफाइल तयार केल्यानंतर, तुम्ही विक्री करू इच्छित असलेल्या विविध श्रेणींमधील उत्पादने निवडू शकता. त्यानंतर, तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे मित्र आणि कुटुंबियांसोबत उत्पादने शेअर करू शकता. जेव्हा कोणी तुमच्या लिंकवरून उत्पादन विकत घेईल तेव्हा तुम्हाला कमिशन मिळेल.

मीशोवर कमिशनचे रेट काय आहे?

उत्तर: मीशोवरील कमिशनचे रेट प्रॉडक्ट श्रेणीनुसार बदलतात.

मीशोवर मला पैसे कसे मिळतील?

उत्तर : मीशो बँक हस्तांतरण किंवा UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) द्वारे कमिशन देते. पेमेंट प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते तपशील किंवा UPI आयडी देणे आवश्यक आहे.

मीशोवर रिसेलिंग सुरू करण्यासाठी मला काही गुंतवणूक करावी लागेल का?

उत्तर: नाही, मीशोवर पुनर्विक्री सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणतेही प्रकारच्या गुंतवणुकीची गरज नाही. तुम्ही शून्य गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता आणि तुम्ही विकत असलेल्या उत्पादनांवर कमिशन मिळवू शकता.

Meesho वर पैसे कमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया फॉलोवर असणे आवश्यक आहे का?

उत्तर: नाही, मीशोवर पैसे कमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फॉलोवर असणे आवश्यक नाही. तुम्ही WhatsApp वर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत मीशो प्रॉडक्ट शेअर करून सुरुवात करू शकता आणि हळूहळू तुमचे नेटवर्क आणि कमाई वाढवू शकता.

Leave a Comment