रोपवाटिका नर्सरी व्यवसाय माहिती मराठी | Nursery Business Information In Marathi.

रोपवाटिका नर्सरी व्यवसाय कसा सुरू करावा? / How To Start A Nursery business In Marathi?

Nursery Business Information in Marathi

आज आपल्या पोस्टमध्ये आपण प्लांट नर्सरी व्यवसायाबद्दल ( Nursery Business Information Marathi ) ए टू झेड माहिती पाहणार आहोत. रोपवाटिका नर्सरी व्यवसाय तुमच्यासाठी एक चांगले कमाईचे साधन होऊ शकते ,जर तुम्हाला गार्डनिंग करायला व वृक्षारोपण करायची आवड असेल तर तुम्ही नक्की यशस्वी व्यवसाय करू शकतात. या पोस्टमध्ये आम्ही आज तुम्हाला नर्सरी व्यवसाय कसा सुरू करता येईल? / How To Start A Nursery business In Marathi? याविषयी माहिती देणार आहोत.

रोपवाटिका नर्सरी व्यवसाय माहिती मराठी / Nursery Business Information In Marathi.

रोपवाटिका नर्सरी व्यवसाय काय आहे? प्लांट नर्सरी व्यवसाय कसा सुरू करायचा? रोपवाटिका नर्सरी व्यवसायामध्ये काय सामान लागते? नर्सरी व्यवसायासाठी वृक्षांची निवड कशी करायची ? रोपवाटिका नर्सरी व्यवसायासाठी जागेची निवड कशी करायची? याच बराबर तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी कोण कोणते लायसन्स लागतील. नर्सरी व्यवसायामध्ये प्रॉफिट मार्जिन किती असणार आहे? प्लांट नर्सरी व्यवसाय यशस्वी कसा करायचा?. या सर्व विषयावर आम्ही माहिती घेऊन आलो आहोत.

रोपवाटिका नर्सरी व्यवसाय काय आहे? / What Is Nursery Business?

नर्सरी व्यवसायामध्ये जमिनीच्या छोट्याशा तुकड्यावर वृक्षांच्या बिया व दुसऱ्या साधनांद्वारे वृक्ष लागवड केली जाते. नर्सरीमध्ये तयार केलेल्या रोपांना किंवा वृक्षांना मार्केटमध्ये विकले जाते. रोपवाटिका नर्सरी व्यवसायमध्ये खूप प्रकारचे रोप जसे की सजावटीचे रोप,फळांचे रोप,फुलांचे रोप,भाजीपाल्याची रोप,विदेशी फुल फळ रोप इत्यादी प्रकारचे रोप ही रोपवाटिका व्यवसायमध्ये लावली जातात. बऱ्याच घरामध्ये येणाऱ्या गुलाब व इतर फुलांचे रोप हे नर्सरी मधून येत असतात.

रोपवाटिका नर्सरी व्यवसाय कसा सुरू करायचा? / How To Start A Nursery business In Marathi?

  • तुम्ही तुमच्या घराच्या छतावर करू शकता,गार्डनमध्ये करू शकता,शेताच्या छोट्याशा तुकड्यावर करू शकता,भाड्याने घेतलेल्या जागेवर इत्यादी ठिकाणी तुम्ही रोपवाटिका नर्सरी व्यवसाय कसा सुरू शकता.
  • हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला रोपांविषयी महिती असणे आवश्यक आहे.जसे की रोपांचा उगायला लागणारा वेळ, मातीची माहिती,पाणी कधी देयचे इत्यादी माहिती हवी.
  • जर तुम्हाला रोपांविषयी,मातीविषयी व इतर नर्सरी माहिती नसेल तर ती तुम्ही ऑनलाईन मिळवू शकता.

रोपवाटिका नर्सरी व्यवसायामध्ये कोणत्या गोष्टींची गरज लागते?

  1. सगळ्यात पहिले तुम्हाला जागेची निवड करावी लागेल, जागेची निवड रोपवाटिका नर्सरी व्यवसायामध्ये फार महत्वाची आहे.
  2. या व्यवसायासाठी तुम्ही घराचे छत,शेती, किंवा एखादा प्लॉट कामामध्ये घेऊ शकतात.
  3. जागेशिवाय लागणारी महत्वाची वस्तू म्हणजे रोप लावायची कुंडी आहे.तुम्ही प्लॅस्टिक किंवा मातीचे किंवा शेणाच्या कुंड्या रोप लावायला वापरू शकतात.
  4. रोप-बिया लागवडीसाठी व जलद वाढीसाठी शेण खत आणि रासायनिक खताचा वापर तुम्हाला करावा लागेल.
  5. तुम्हाला माती खोदण्यासाठी व रोप रोवण्यासाठी लागणारे साहित्य लागेल.कुदळ,खोर,खुरपणी इत्यादी सामान तसेच इतर मशिनरी लागतील.
  6. तुम्हाला मजुरांची गरज पडेल पण सुरुवातीला जर तुम्ही स्वतः छोट्या स्वरूपात हा व्यवसाय करत असाल तर हे मॅनेज होऊन जाईल.
  7. रोपवाटिकासाठी तुम्हाला पाण्याची चांगली व्यवस्था करावी लागेल.यासाठी तुम्ही पाण्याचा बोर घेऊ शकता किंवा विहीर खोदुन कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करू शकता.
  8. काही रोपांना दिवसभर तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकत नाही अशा रोपांसाठी तुम्हाला हिरव्या कापडाची गरज पडेल.

रोपवाटिका नर्सरी व्यवसायामध्ये रोपांची निवड कशी करावी?

खालीलपैकी पाच उदाहरणाद्वारे आपण तुम्ही रोपांची निवड कशी करू शकता हे पाहूया👇

  1. जर तुम्ही फुलांची नर्सरी व्यवसाय करणार असाल तर तुम्ही गुलाबाचे फुलाचे रोप लावू शकता.
  2. जर तुम्हाला भाजीपाल्याचे रोपवाटिका करायची असेल तर खूप सारे भाजीपाल्याचे रोप तयार करता येतात ते नर्सरीमध्ये तयार होतात व मग त्यांना शेतात लावतात.
  3. फळांच्या रोपांमध्ये तुम्ही पेरू,आंबा,संत्री इत्यादी रोप लावू शकतात.या प्रकारचे रोप आपण विकत घेऊन शेतात लावत असतो त्यामुळे अशा रोपांना प्रचंड मागणी असते.
  4. सागवान ,चंदनसारख्या बहुमुल्ये झाडांची रोपसुद्धा तुम्ही तुमच्या नर्सरीमध्ये तयार करू शकतात.
  5. खूप प्रकारचे विदेशी झाड आहेत त्यांची मागणी मार्केटमध्ये खूप आहे.असे मागणीत असलेले शो चे झाडांचे रोप तुम्ही तयार करू शकतात.
  6. रोपवाटिका नर्सरी व्यवसायामध्ये रोपांची निवड अशा प्रकारे केली पाहिजे की कमी भांडवलमध्ये जास्त प्रॉफिट तुम्हाला या व्यवसायामधून झाले पाहिजे.

रोपवाटिका नर्सरी व्यवसायामध्ये जागेची निवड कशी करावी?

रोपवाटिका नर्सरी व्यवसायामध्ये जागेची निवड अशा प्रकारे करायची आहे की तुम्हाला रोप विकायला शहरात जायला सोपे किंवा जवळ पडले पाहिजे.

रोपवाटिका नर्सरी व्यवसायामध्ये लागणारे लायसन्स कोणती आहे?

भारताच्या खूप साऱ्या राज्यात नर्सरी व्यवसायासाठी सरकारकडून सबसिडी दिली जाते. जर तुम्हाला सबसिडी विषयी अधिक माहिती हवी असेल तर आपण उद्योग विभागाला भेट देऊन सबसिडी विषयी माहिती मिळवू शकतात.
नर्सरी व्यवसाय मोठ्या स्वरूपात करण्यासाठी तुम्हाला लायसन्स व जीएसटी नंबर घ्यावा लागेल.

रोपवाटिका नर्सरी व्यवसायासाठी बिया व रोप कुठून घ्यावीत?

नर्सरी व्यवसायासाठी बिया व रोप घेण्यासाठी कृषी विभाग सर्वात चांगला पर्याय आहे.
कृषी विभागा व्यतिरिक्त तुम्ही खाजगी नर्सरी मालकांकडून सुद्धा बिया व रोप विकत घेऊ शकतात.

रोपवाटिका नर्सरी व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

रोपवाटिका नर्सरी व्यवसाय मध्ये तुम्हाला सुरुवातीला किती भांडवल लागेल हे तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करू इच्छित आहेत त्यावर अवलंबून आहे.
जर तुम्ही नर्सरी व्यवसाय छोट्या जागेत सुरू करत असाल तर तुम्हाला 25 ते 50 हजार रुपये इतके भांडवल लागेल.
सुरुवातीला तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये भांडवल लागेल.

रोपवाटिका नर्सरी व्यवसायामध्ये प्रॉफिट किती होईल?

रोपवाटिका नर्सरी व्यवसायामध्ये तुमचा प्रॉफिट तुमच्या भांडवलावर अवलंबून असणार आहे.तुमची इन्व्हेस्टमेंट चांगली असेल तर तुम्ही महिन्याला 25 ते 75 हजार रुपये कमवू शकतात.

रोपवाटिका नर्सरी व्यवसाय यशस्वी कसा करावा?

जर तुम्ही तुमच्या रोपवाटिका नर्सरी व्यवसायाची योग्य पद्धतीने मार्केटिंग केली तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
नर्सरी व्यवसायाची मार्केटिंग तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्हीही पद्धतीने करू शकतात.
ऑनलाइन मार्केटिंग करत असताना तुम्ही व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडियाचा वापर करू शकतात.
ऑफलाइन मार्केटिंगमध्ये तुम्ही न्युज पेपर मध्ये ऍड देऊ शकतात, व्यवसायाचे बॅनर लावू शकतात, पोम्प्लेट छापू शकतात, इत्यादी पद्धतीने तुम्ही नर्सरी व्यवसायाची मार्केटिंग करू शकतात.

FAQ

नर्सरी व्यवसाय म्हणजे काय?

नर्सरी व्यवसायामध्ये जमिनीच्या छोट्या तुकड्यावर किंवा शेतामध्ये बियाणेद्वारे रोप उगवली जातात. रोपे तयार झाल्यानंतर ही रोपे मार्केटमध्ये विकली जातात यालाच नर्सरी व्यवसाय म्हणतात.

मी भारतात रोपवाटिका परवाना कसा मिळवू शकतो?

भारतात प्रत्येक राज्याचे आपल्या वेगवेगळ्या विभागाचे परवाने देण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहेत.तुमच्या राज्याचा कृषी परवाने वेबसाईटवर जाऊन तुम्ही रोपवाटिका व्यवसायासाठी परवाना ऑनलाईन घेऊ शकतात.

वनस्पती रोपवाटिका व्यवसायाचे प्रकार कोणते आहेत?

रोपवाटिका नर्सरी व्यवसाय मुख्यतः तीन प्रकारे आहेत.
1 ) रिटेल नर्सरी ( लहान नर्सरी) 2) कमर्शियल प्लांट नर्सरी 3) लैंडस्केप प्लांट नर्सरी (खासगी नर्सरी )

रोपवाटिका हा एक फायदेशीर व्यवसाय आहे का?

हो,रोपवाटिका एक फायदेशीर व्यवसाय आहे व तुम्ही अगदी कमी भांडवलमध्ये सुध्दा तुमच्या घरच्या छतावरून,शेतातून,छोट्या जमिनीच्या तुकड्यावरून चालू करू शकतात.

Leave a Comment