महिलांसाठी व्यवसाय आयडिया मराठी / Mahilansathi Gharguti Vyavsay 2024
आजच्या आपल्या पोस्टमध्ये आम्ही काही बिझनेस आयडिया आज घेऊन आलो आहोत ज्या महिला घरबसल्या किंवा घराबाहेरून अगदी कमी इन्वेस्टमेंट मध्ये किंवा कोणती इन्व्हेस्टमेंट न करता करू शकतात.हे व्यवसाय करण्यासाठी महिलांना जास्त शिक्षणाची गरज पडणार नाही. फक्त तुम्ही क्रिएटिव असणे गरजेचे आहे आणि तुमच्या मध्ये काही ना काही तरी स्किल्स असणे गरजेचे आहे.
महिलांसाठी घरगुती व्यवसाय यादी / Women Business Ideas In Marathi.
खाली आम्ही काही महिलांना घरातून करता येतील असे व्यवसाय दिले आहे.आम्हाला अपेक्षा आहे तुम्हाला त्या घरगुती व्यवसाय कल्पना आवडतील व तुम्ही नक्कीच स्वतःचा व्यवसाय सुरू करून पैसे कमवतान.👍
किड्स केअर सेंटर :-
आजच्या काळात आई-वडील आपल्या मुलांकडे नीट लक्ष देऊ शकत नाही कारण दोघेही कुठेतरी कामाला असतात.पण त्यांना आपल्या मुलांना दिवसभर कसे राहतील याचे टेन्शन असते.त्यामुळे असे पालक आपल्या मुलांसाठी एक चांगले किड्स केअर सेंटर शोधत असतात आणि त्यासाठी ते चांगली फीस देण्यासाठी तयार असतात.
किड्स केअर सेंटर चालू करण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज पडत नाही आणि भांडवलही लागत नाही.
जर तुम्हाला लहान मुले आवडतात किंवा तुम्हाला घरी भरपूर वेळ असतो तर तुम्ही किड्स केअर सेंटर चालू करून चांगले पैसे कमवू शकतात.
मेस / टिफिन बिजनेस:-
मेस / टिफिन बिजनेस तुम्ही तीन प्रकारे घरातून करू शकतात.
टिफिन किंवा मेसचा व्यवसाय :- तुमच्या एरियामध्ये खूप सारे विद्यार्थी शिक्षणासाठी राहत असतील किंवा घराच्या आसपास बाहेर गावावरून कामासाठी लोक येऊन राहत असतील तर तुम्ही मेस किंवा टिफिन व्यवसाय सुरू करू शकतात.टिफिन व मेसमध्ये सध्याच्या वेळेला 2200 ते 2500 रुपये एका व्यक्तिमागे घेतले जातात.त्यामुळे सुरवातीला घरातून तुम्ही 10 ते 20 मेस-डब्बा मेंबर हँडल करू शकतात.याव्यवसायात तुम्ही मेसचे पैसे पहिलेच घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची गरज पडणार नाही.
पैकेज फूड सर्विस :-यामध्ये तुम्ही ड्राई स्नैक्स पॅकेज करून घरातूनच किंवा आसपासच्या दुकानात विकू शकतात.यामध्ये फरसाण,चिवडा,लाडू,चकली,शेंगदाण्याचे पदार्थ,इत्यादी घरातून बनून पॅकेज विकू शकतात.
कार्यक्रम फूड सर्विस :- तुम्ही तुमच्या घराच्या आसपासच्या बर्थडे पार्टीच्या,पार्टीच्या,कार्यक्रमाच्या जेवणाच्या ऑर्डर घेऊ शकतात.आजकाल घरगूती आणि हेल्दी व पौष्टिक जेवण लोकांना आवडते.त्यामुळे तुम्हाला चांगल्या ऑर्डर मिळतील आणि तुम्हाला चांगली कमाई होईल.
यूट्यूब चैनल
तुम्ही कपडे शिलाई, कुकिंग चैनल, कॉस्मेटिक वस्तूंचे रिव्ह्यूज इत्यादींचे युट्युब चॅनेल चालू करू शकतात. आज मार्केटमध्ये खूप सारे कॉस्मेटिक प्रोडक्ट दररोज येत असतात आणि ते स्वस्त असल्यामुळे महिला त्यांना विकत घेतात. त्यानंतर ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्यांना नवनवीन साईड इफेक्टला सामोरे जावे लागते. त्यामुळे महिला सगळ्यात पहिले कॉस्मेटिक प्रॉडक्ट चे रिव्ह्यूज पाहणे पसंत करतात. अशामध्ये जर तुम्ही कॉस्मेटिक वस्तूंचे रिव्ह्यूज यूट्यूब चैनल ओपन केले तर तुम्हाला चांगले इनकम होऊ शकते.
याशिवाय तुम्हाला कुकिंग किंवा शिलाई काम आवडत असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही एक चांगले युट्युब चॅनेल बनवू शकतात. जेव्हा तुमच्या यूट्यूब चैनल चे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाइम होईल त्यानंतर तुमचे चैनल youtube मधून अर्निंग करण्यासाठी क्वालिफाय होईल व तुम्ही त्यातून पैसे कमवू शकतात.
फिटनेस सेंटर
आपल्याकडे खूप सार्या जिम्स आहेत परंतु महिलांसाठी फार कमी किंवा काही एरियामध्ये एक पण फिटनेस सेंटर नाहीये. आजच्या टाईम मध्ये सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी असते आणि महिलांनाही फिटनेसची गरज आहे.महिला व मुली सेक्युरिटीच्या कारणामुळे तिथे जेंट्स जिमला जातात तिथे जाणे पसंत करत नाही.अश्या मध्ये जर तुम्ही महिलांसाठी फिटनेस सेंटर उघडले तर तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल व तुम्हाला चांगली कमाई देखील होईल.
जर तुम्ही तुमच्या फिटनेस सेंटरमध्ये मॅनेजर व फिटनेस ट्रेनर महिलाच ठेवल्यातर जास्तीत जास्त महिला या तुमचे फिटनेस सेंटर जॉईन करतील.
कॉस्मेटिक शॉप :-
कॉस्मेटिक शॉप ज्यादातर पुरुषच चालवतात परंतु महिलांना कॉस्मेटिक बदल जास्ती माहिती असते.हा असा व्यवसाय आहे याचा मधील प्रॉडक्टची मागणी नेहमी महिलांकडून होत राहील.
तुम्ही सुरुवातीला कमी इन्व्हेस्टमेंट असेल तर तुमच्या घरातून हा व्यवसाय सुरु करू शकतात आणि हा व्यवसाय एखादी महिला करत असेल तर महिलांना त्याठिकाणी जाऊन प्रॉडक्ट विकत घ्याला आवडेल! कॉस्मेटिक प्रॉडक्ट बरोबर महिलांना लागणारे इतर वस्तूही तुम्ही तुमच्या शॉपमधून विकू शकतात.
अगरबत्ती आणि मेणबत्ती व्यवसाय :-
आपल्या देशात दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात व घरात अगरबत्ती व दिवा लावून पूजा होत असते.जर तुम्ही अगरबत्ती आणि मेणबत्ती घरी बनवण्याचा व्यवसाय केला तर नक्कीच प्रोफिटेबल होऊ शकतो.अगदी सुरुवातीच्या काळात तुम्ही दुसऱ्याकडून घेऊन मेणबत्ती व अगरबत्ती विकू शकता व त्याप्रॉफिट वर तुम्ही अगरबत्ती आणि मेणबत्ती मेकिंग मशीन घेऊ शकतात.
अगरबत्ती आणि मेणबत्ती व्यवसायमध्ये तुम्ही विविध वासाचे प्रोडक्शन करू शकतात कारण अश्या सुगंधी अगरबत्तीची व सुंदर मेणबत्तीची बाजारात डिमांड आहे.तुम्ही तुमच्या घराच्या आसपासच्या सर्व महिलांना तुमच्यासोबत घेऊन गृहउदोग सुरू करू शकतात.सगळ्या महिलांनी मिळून जर यात इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला अधिक सोपे पडेल.आणि अशा व्यवसायासाठी सरकार कर्ज देत असते.
ब्युटी पार्लर व्यवसाय :-
ब्युटी पार्लरचा व्यवसाय खूप साऱ्या महिलांना आवडतो आणि खूप साऱ्या महिला आज ब्युटी पार्लर करून आपल्या संसारात हातभार लावत आहे.पण तुम्ही ब्युटी पार्लर बरोबरच ब्युटी पार्लर कोचिंग क्लास पण देऊ शकता आणि पैसे कमवू शकता.तुम्ही ब्युटी पार्लरचे घर बसल्या ऑनलाईन क्लास देखील घेऊ शकतात.
ब्युटी पार्लरचा व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्ही ब्युटी पार्लर येत असलेल्या मुली कामाला ठेऊ शकतात आणि ज्या महिलांना त्यांचा घरी ब्युटी पार्लर करून पाहिजे आहे त्यांचा इथे पाठवू शकतात.तुम्हाला त्या महिलांचा पगार आणि ब्युटी पार्लरसाठी लागणारे कॉस्मेटिक प्रोडक्ट आणि साहित्य द्यायचे आहे.तुम्ही तुमच्या ब्युटी पार्लरमध्ये जेवढे जास्त नवीन मशिनरी व प्रोडक्टचा वापर करतान तेवढे जास्त तुमच्याकडे ग्राहक येतील.तुम्ही तुमच्याकडे असलेले मशिनरी व साहित्य भाड्याने देऊन ही पैसे कमवू शकतात.
ज्वेलरी मेकिंग आणि सेलिंग व्यवसाय :-
ज्वेलरी मेकिंग म्हंटल्यावर तुम्हाला खूप मोठा काही तरी जास्त भांडवल लागेल असा व्यवसाय करायचा आहे असे वाटेल, परंतु ज्वेलरी व्यवसायमध्ये तुम्हाला ज्वेलरी चे पार्ट बाजारातून कमी किमतीत विकत घ्यायचे आहे. त्यानंतर ज्वेलरीचे पार्ट असेंबल करून तुम्हाला ज्वेलरी बनवायची आहे.
तुम्ही बनवलेली ज्वेलरी तुम्ही घरातून किंवा मार्केटमध्ये चांगल्या किमतीला विकू शकता.जर तुम्ही स्वतः ज्वेलरी असेंबल कराल व चांगली फॅशनेबल ज्वेलरी बनवली तर तुम्हाला चांगली कमाई होईल.
टिकल्या व्यवसाय:-
टिकल्या बनवण्याचा व्यवसाय हा नेहमी चालणारा व्यवसाय आहे आणि टिकल्यांची डिमांड महिलांमध्ये नेहमीच असते. हा व्यवसाय तुम्हाला लाईफ टाईम पैसे कमवून देऊ शकतो. टिकल्या बनवण्यासाठी तुम्हाला काही रॉ मटेरियल ची गरज पडेल जसं की ग्लु,प्रिंटिंग मशीन,स्टोन,टिकल्याचे कापड इत्यादी लागेल.
टिकल्या बनवून तुम्ही स्वतः मार्केट मध्ये विकू शकतात किंवा तुम्ही एखाद्या कंपनीला कॉन्टॅक्ट करून त्यांना देखील विकू शकतात.कोणत्या वेळेस कोणती फॅशन चालू आहे त्यानुसार तुम्ही टिकल्या बनवल्या तर तुम्हाला जास्त प्रॉफिट होऊ शकेल.
चॉकलेट आणि केक व्यवसाय :-
हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हे शिकवे लागेल की विविध प्रकारचे चॉकलेट आणि केक कसे बनवतात.बरेच सारे youtube चॅनेल्स आहेत जे फ्री मध्ये चॉकलेट आणि केक कसे बनवायचे हे शिकवतात.तुम्ही तुमच्या घराच्या आसपासच्या बर्थडे केकच्या ऑर्डर घेऊ शकतात.
तसेच तुमच्या घरातून केक आणि चॉकलेट बनवून बेकरी शॉप किंवा दुकानात पण विकून चांगली कमाई करू शकतात.
महिलांसाठी घरगुती पॅकिंग व्यवसाय
पापड व्यवसाय :-
पापड बनवण्याचे काम कोणती महिला घरातून करू शकते.पापड तुम्ही स्वतःच्या हाताने लाटून पण सुरुवातीला बनवू शकतात त्यानंतर तुम्ही पापड बनवायचे मशीन देखील घेऊन फास्ट पापड बनवू शकतात.पापड बनवायचे मशीन हे 12 ते 15 हजार रुपये पर्यन्त येऊन जाईल.
पापड बनवायची मशीन ऑनलाईन तुम्हाला मिळेल तसेच पापड बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. तुम्ही बनवलेले पापड आसपासच्या दुकानात आणि होलसेल मार्केटमध्ये विकून चांगली कमाई करू शकतात.