कॉलेज स्टुडेट्स पार्ट टाईम जॉब आयडिया / Part time job ideas for college students In Marathi 2024.
मित्रांनो आजची पोस्ट ही कॉलेज स्टूडेंट साठी आहे जे शिक्षण घेत असताना पार्ट टाइम काम करून ज्यांना पैसे कमवायचे आहेत. आपल्या आजच्या पोस्टमध्ये आपण पार्ट टाइम जॉब पाहणार आहोत ज्याने तुम्ही लाखो तर नाही पण बऱ्यापैकी पैसे कमवू शकता. हे पार्ट टाईम काम करून तुमचे पॉकेट मनी आणि अभ्यासाचा खर्च जसे की पुस्तके, क्लासची फी इत्यादी खर्च आरामात निघून जाईल.
पार्ट टाइम काम करून पैसे कमवायचे असतील तर लोकांशी बोलण्याची स्किल्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत. इथे काही मुले फ्रीलान्सर आणि पार्ट टाइम जॉब मध्ये कॉन्फिडंट असतात परंतु या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
फ्रीलान्सर व पार्ट टाइम जॉब यातील फरक
हे जे फ्रीलान्सर आहे याला तुम्ही तुमचा बिजनेस समजू शकता, ज्यामध्ये तुम्हाला काही स्किल्स आल्या पाहिजेत जसे की Editing, Graphic designing, Content Writing यासारख्या स्किल्स पाहिजेत. या स्किलवर तुम्हाला क्लाइंट शोधावे लागतात यामध्ये डील तुम्हालाच कराव लागते आणि पेमेंट तुम्हालाच घ्यावा लागते आणि सगळे काही तुम्हालाच कराव लागते. तर फ्रीलान्सर जॉबला तुम्ही एक प्रकारचा बिजनेस देखील म्हणू शकता.
पार्ट टाइम वर्क यासाठी वेगळी आहे की यामध्ये तुम्हाला कोणत्यातरी ऑर्गनायझेशन साठी काम करावे लागते आणि यात तुमच्याकडे स्किल असो किंवा नसो तुम्हाला काम मिळू शकते. पार्ट टाइम जॉब विद्यार्थ्यांसाठी चांगले आहे कारण की त्यांना कामाचे वातावरण मिळते जास्त लोड नसतो नवीन लोकांना भेटायला मिळते व नवीन स्किल्स शिकायला मिळतात.
पार्ट टाइम जॉब आयडिया स्टूडेंटसाठी / Part Time Jobs Ideas For Students In Marathi 2024.
इन्शुरन्स एजंट / Insurance Agent :-
इन्शुरन्स एजंट बनणे हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे पार्ट टाइम जॉब करण्याचा असे मला वाटते. एक इन्शुरन्स एजंट तुम्ही असताना तुमचे पॅसिव्ह पद्धतीने इनकम चालू असते व तुमच्या कम्युनिकेशन स्किल व प्रेसेंटेशन स्किल्स पण चांगले होतात. तुम्ही एलआयसी, बजाज, आदित्य बिर्ला, यासारखे कंपन्यांचे एजंट बनू शकता. यासाठी तुम्हाला IRDA चा एक्साम द्यावा लागतो त्यानंतर तुम्ही एजंट बनतात.
तुम्ही एलआयसी एजंट असताना दुसरे कोणतेही कंपनीचे एजंट बनवू शकता. जेव्हा पण तुमचा कस्टमर एक अमाऊंटचा प्रीमियम भरेल तेव्हा तुम्हाला एक विशिष्ट अमाऊंटचा कमिशन मिळत राहील. त्यामुळे तुमचे हे एक पॅसिव्ह इनकम बनते. म्हणजे तुम्ही एकदा काम केल्यावर तुम्हाला इन्कम चालू राहते.
डिलिव्हरी जॉब्स / Delivery Jobs :-
तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी जॉब्स करू शकतात जसे की या ॲमेझॉन चे ॲमेझॉन फ्लेक्स आहे. ॲमेझॉन फ्लेक्स मध्ये तुम्ही त्यांचे पार्सल डिलिव्हरी करून पार्ट टाइम पैसे कमवू शकतात.या व्यतिरिक्त तुम्ही zomato आणि Swiggy चे फूड डिलिव्हरी करून Part time पैसे कमावू शकतात.तुम्ही तुमच्या मर्जीने वेळ मिळेल तसे डिलिव्हरी जॉब्स करू शकतात.दिवसातून 10 ते 12 पार्सल तुम्ही डिलिव्हर केले तर तुमचे 500 ते 600 रुपये होतात.
शिकवणी शिक्षक / Tuition teacher :-
तुम्ही तुमच्या पेक्षा लहान विद्यार्थ्यांना शिकवून चांगले पैसे कमवू शकतात. जर तुम्ही डायरेक्ट ट्युशनचे क्लासेस मोठ्या प्रमाणावर घ्यायला सुरुवात केली तर त्यावर तुम्हाला फार कमी रिस्पॉन्स मिळेल. कारण तुमच्या क्लासचे ब्रँड व्हॅल्यू नाही तुमचा कोणता पास्ट रेकॉर्ड ही नसेल व तुम्हाला कोणी ओळखले नसेल त्यामुळे विद्यार्थी तुमच्याकडे क्लासला येणार नाही.
सुरुवातीला तुम्ही घरातूनच होम ट्युशन देऊ शकतात. होम ट्युशन मध्ये तुमच्या टाईमच्या ऍडजेस्टमेंट नुसार तुम्ही विद्यार्थ्यांना क्लास देऊ शकता. तुम्ही सुरुवातीला फ्री मध्ये सुद्धा ट्युशन देऊ शकता व जसे जसे विद्यार्थी वाढतील त्यानंतर फी आकारू शकता. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे शिकवले तर तुम्हाला नक्कीच विद्यार्थ्यांचे पालक ट्युशन साठी पैसे द्यायला तयार होतील.
ऑनलाइन उत्तर लेखन / Online Answer Writing :-
ऑनलाइन आंसर रायटिंग यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांचे अकॅडमीक प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतात.उदा. bartleby.com/ च्या वेबसाईट मध्ये जाऊन तुम्हाला सब्जेक्ट एक्स्पर्ट च्या स्वरूपात रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तुमची एक्झाम घेतली जाते त्यामध्ये सोपे प्रश्न विचारले जातात ते देऊन तुमचे फायनल रजिस्ट्रेशन पूर्ण होते. तुम्हाला त्यानंतर एक हप्त्याने एक असाइनमेंट दिली जाते व ती पूर्ण केल्यानंतर तुम्ही एक सब्जेक्ट एक्सपर्ट बनतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर देता देता त्या विषयांमध्ये पूर्णपणे एक्सपर्ट होतात जे तुम्हाला पुढील भविष्यात कामी येईल.
व्यापारी एजंट / Merchant Agent :
ॲमेझॉन पे फोन पे गुगल पे यांचे तुम्ही मर्चंट एजंट बनू शकता. मर्चंट एजंट म्हणजे दुकान मध्ये लावलेले क्यूआर कोड बारकोड स्कॅम असतात ते लावायचे काम तुमच्याकडे असते एका क्यूआर कोड मागे तुम्हाला अंदाजे दोन ते तीनशे रुपये मिळतात यामध्ये तुम्हाला सॅलरी दिली जात नाही परंतु तुम्ही जेवढ्या जास्त दुकानांमध्ये QR कोड लावतात तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळतात. यामध्ये जॉइनिंग करण्यासाठी तुमच्या एरियातील टीम लीडरशी तुम्हाला बोलावं लागेल.
हे काम कसे घ्यायचे यावर youtube वर तुम्हाला असंख्य व्हिडिओ मिळतील आणि या कामांमध्ये तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स असणे गरजेचे आहे.