ज्यूस बार व्यवसाय कसा सुरू करावा? | Juice Shop Business Information In Marathi 2024.

ज्यूस व्यवसाय माहिती मराठी / Juice Shop Business Information In Marathi 2024.

Juice Shop Business Information In Marathi

मित्रांनो एक छोटाशा व्यवसाय आयडियाला तुम्ही खूप मोठे बनवू शकता. जर तुमच्याकडे त्या व्यवसायाची प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी व तुमचे विचार मोठे असतील तर तुम्ही कोणताही व्यवसाय प्रॉफिटेबल करू शकतात.

फळाच्या ज्यूसचा व्यवसाय कायम चालणारा प्रोफिटेबल व्यवसाय आहे. आज बहुतांश लोक आपल्या आरोग्य संबंधित जागरूक झाली आहेत व त्यामुळे ते फळांचा ज्यूस पिणे पसंत करतात. आपल्या आवडीनुसार प्रत्येक माणूस वेगवेगळे फळांचा ज्यूस पित असतो.आज कोणी मोसंबी, आंबा, अंजीर, पायनॅपल, चिक्कू ,मिक्स फ्रुट इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस पिणे लोक पसंत करतात त्यामुळे ज्यूसचा व्यवसाय चांगल्या प्रकारे प्रोफिटेबल चालत आहे.

ज्यूसचा बिझनेस सदाबहार चालणारा व्यवसाय आहे याचा कोणताही सीजन नाही. या व्यवसायामध्ये सीजननुसार ज्यूस चालतात परंतु सर्व सीजनमध्ये हा व्यवसाय उत्तम रित्या चालू असतो.

ज्यूस बार व्यवसाय डिमांड कशी आहे? किंवा ज्यूस बार व्यवसाय फ्युचर स्कोप काय आहे?

  • आज ज्यूसला एक हेल्दी ड्रिंक म्हणून पाहिले जाते व पिले जाते. चहापासून व कॉफीपासून काही लोकांना ऍसिडिटी होऊ शकते. फळांच्या रसातून कोणताही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम होत नाही आणि ज्यूसमध्ये नॅचरल साखर असते व मिनरल व विटामिन असतात जे की आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
  • एका व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या व्यवसायामध्ये खूप जास्त स्किलची गरज पडत नाही. तुम्हाला फक्त फळांची कटिंग आणि चॉपिंग येत असेल तरी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात.
  • भारतामध्ये फ्रुट ज्यूस व्यवसायासाठी फार जास्त स्कोप आहे कारण भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात उष्णता आहे. जे लोक रोज कामाला जातात,जे विद्यार्थी शाळेत व कॉलेजमध्ये जातात त्यांच्यासाठी एक फ्रेश ज्यूस ड्रिंक फार चांगला ड्रिंकिंग ऑप्शन आहे.
  • आज ताज्या ज्यूसचे फार कमी ऑप्शन असल्यामुळे लोक कोल्ड्रिंक्स व पॅकेज ज्यूस घेतात.अशा ड्रिंक्समध्ये खूप मोठया प्रमाणात शुगर आणि केमिकल युक्त पदार्थ टाकलेले असतात.
  • जर तुम्ही असा एक व्यवसाय किंवा फ्रेंचायजी सुरू करत असाल ज्यामध्ये तुम्ही फ्रेश ज्यूस ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत असाल तर ग्राहक तुमच्याकडे ते खरेदी करण्यासाठी नक्कीच येतील.
  • प्रॉफिट मार्जिन पाहिजे तर हा व्यवसाय तुम्हाला 60% to 70% एवढे जास्त प्रॉफिट मिळवून देऊ शकते.

ज्यूसचा व्यवसाय कोणत्या प्रकारे चालू करता येईल?

  1. ज्यूस बारचा व्यवसाय तुम्ही तुमच्या भांडवलानुसार दोन प्रकारे चालू करू शकतात.
    एक प्रकारे तुम्ही फिरत्या गाडीवर तुम्ही तुमचे सर्व साहितय लावून हा व्यवसाय कोणत्याही ठिकाणी करू शकतात.
  2. दुसऱ्या प्रकारे तुम्ही एक शॉप भाड्याने किंवा विकत घेऊन तिथे प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट करून ज्यूसचा व्यवसाय सुरू करू शकतात. तुम्ही तुमच्या भांडवलानुसार तुम्हाला कोणत्या पद्धतीने ज्यूसचा व्यवसाय करायचा आहे ते ठरवू शकतात.

ज्यूसचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोण कोणत्या गोष्टींची गरज पडेल?

  1. ज्यूसचा शॉप सुरू करण्यासाठी फार कमी सामान लागते म्हणजे कमी भांडवलमध्ये तुम्ही या वस्तू विकत घेऊ शकतात.ज्युसबार शॉपसाठी तुम्हाला ज्यूस मिक्सर, ग्राइंडर, ग्लासेस, स्ट्रॉ,कटर,पिलर, टेबल,खुर्च्या, काउंटर व रेफ्रिजरेटर इत्यादी छोटया मोठया वस्तू लागतात.
  2. तुम्ही एक फ्रिजच्या ऐवजी तुम्ही एक आईस बॉक्स विकत घेऊ शकतात.
  3. हायजेनिकसाठी हातामध्ये डिस्पोजिबल हॅन्ड ग्लोज व अप्रोन असणे फार गरजेचे आहे.हॅन्ड ग्लोज व अप्रोनकडे पाहून ग्राहकांच्या मनात तुमच्याकडे हायजिनिक ज्यूस असल्याची भावना निर्माण होईल व ते तुमच्याकडून ज्यूस विकत घेतील.

ज्युस शॉपसाठी भांडवल किती लागेल?

तुम्हाला आम्ही वर सांगितलेले मशीन व साहित्य लागेल त्याचबरोबर ताजे फळांची तुम्हाला गरज पडेल.फळ तुम्ही होलसेल बाजारपेठमधून घेऊ शकतात.ज्यूस मिक्सर, ग्राइंडर, ग्लासेस, स्ट्रॉ,कटर,पिलर, टेबल,खुर्च्या, काउंटर व रेफ्रिजरेटर इत्यादी सामान तुमचे 80 हजार ते 1 लाख रुपयां पर्यंत येऊन जाईल.तुमचा ज्युस बारचा हा व्यवसाय 1 लाख रुपयांमध्ये आरामात सुरू होऊन जाईल.

ज्यूस बार व्यवसाय करून किती पैसे कमवता येतील?

जर तुम्ही एकाच फळाचा ज्यूस विकत असतान तर तुम्ही 30 ते 40 हजार रुपये महिन्याला कमावता येतील आणि जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फळाचे ज्यूस विकत असाल तर तुम्ही 70 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत महिन्याला पैसे कमवू शकतात. तुमचा ज्यूस बार कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे तिथे किती गर्दी असते यावर तुमचे उत्पन्न अवलंबून असते.

ज्यूस शॉप व्यवसायासाठी सामान कुठून खरेदी करावे?

तुम्हाला ज्यूस शॉप व्यवसायासाठी ताज्या फळांची गरज पडेल ते तुम्ही लोकल मार्केटमधून घेऊन शकता.त्याशिवाय तुम्हाला लागणारे मिक्सर, ग्राइंडर,ग्लासेस व इतर सामान तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, इंडियामार्ट इत्यादी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून स्वस्तात ऑफरमध्ये विकत घेऊ शकतात.

फळांच्या ज्यूससाठी फळे कशी निवडायची?

भारतात खूप सारे फळ हे सिजनल येतात जसे की पायनॅपल,आंबा असे काही फळ सिजनल येतात.तुम्हाला 3 किंवा 4 फळ अशी ठेवायची आहे जी पूर्ण वर्षभर उपलब्ध असतात.जसे की सफरचंद,केळ,मोसंबी,संत्री अशे फळ ठेवायची आहेत याव्यतिरिक्त 3 ते 4 फळ तुम्हाला सिजनल ठेवायची आहे.जसे की किवी, ड्रॅगन फ्रुट,पायनॅपल असे 3 सिजनल व 3 वर्षभर मिळणाऱ्या फळांच्या मदतीने ज्यूस चे अनेक कॉम्बिनेशन बनवू शकतात.

ज्यूस बार व्यवसाय कसा सुरू करावा? (Tips)

  1. तुम्हाला तुमच्या शहरातील सर्वात स्वस्त व ताजे फळ मिळणारे जवळचे मार्केट ओळखणे गरजेचे आहे. दररोज सकाळी तुम्ही त्या जवळच्या मार्केटमध्ये जाऊन फ्रेश फळ अगदी कमी वाहतूक खर्चामध्ये घेऊन येऊ शकतात.
  2. तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या ज्यूसची किंमत ठरवावी लागेल. तुमच्या आसपासच्या ज्यूस बारच्या किमती काय आहेत व ते कशी कॉलिटी देतात हे तुम्हाला पाहून तुम्ही तुमच्या ज्यूसची किंमत ठरवू शकतात.
  3. तुम्हाला इतर ज्यूसबारपेक्षा चांगली कॉलिटी व किंमत कमी ठेवता आली तर तुम्ही ग्राहकांना तुमच्या शॉपकडे आकर्षित करू शकतात.
  4. तुम्हाला तुमच्या ज्यूस बारची चांगल्या प्रकारे जाहिरात करावी लागेल.तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन प्रकारे तुमच्या शॉपची जाहिरात करू शकतात. ऑनलाइन तुम्ही जस्ट डायल व गुगल माय बिजनेस वर तुमचा व्यवसाय रजिस्टर करू शकतात. त्यामुळे तुमच्या भागातील लोकांना तुमच्या शॉप विषयी ऑनलाईन माहिती मिळते.
  5. ऑफलाइन जाहिरातमध्ये तुम्ही पोम्लेट वाटून व ज्यूस बारचा आकर्षक बॅनर लावून जाहिरात करू शकतात.

ज्यूस बार व्यवसायासाठी लागणारे लायसन्स व डॉक्युमेंट कोणती आहेत?

  1. तुम्ही ज्यूस बार व्यवसाय सुरू करत असताना तुम्हाला fssai चे फूड अँड सेफ्टीचे रजिस्ट्रेशन असले तरी चालेल.
    जे की तुम्हाला सिम्पल ऑनलाईन एप्लीकेशन करून मिळून जाईल.
  2. जेव्हा तुमचे वार्षिक टर्नओव्हर बारा लाखाच्या पुढे जातो तेव्हा मात्र तुम्हाला fssai च्या रजिस्ट्रेशनला लायसन्समध्ये रूपांतर करावे लागते.
  3. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी फूड सेफ्टी लायसन्स तुम्ही तेव्हाच घेऊ शकतात जेव्हा तुमचा व्यवसाय रजिस्टर असणार आहे.
  4. व्यवसाय सुरू करताना तुम्ही एक सोलो प्रोप्रायटर म्हणून व्यवसाय सुरू करू शकतात. एका हप्त्याच्या आतमध्ये सोलो प्रोप्रायटरचे तुमचे रजिस्ट्रेशन एक हजार रुपये इतक्या कमी फीमध्ये होऊन जाईल.
  5. तुम्हाला व्यवसायाच्या रजिस्ट्रेशन लायसन्ससाठी पासपोर्ट साईझ फोटो, सरकारी ओळखपत्र जसे की आधार कार्ड ,पॅन कार्ड ,मतदान कार्ड , तुमच्या व्यवसायाचे अड्रेस प्रूफ,तुमची स्वतःची जागा असेल तर त्याचे कागदपत्रे किंवा भाड्याने घेतले असेल तर त्याचे कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत.

FAQ

ज्यूसचे दुकान कसे सुरू करावे?

सगळ्यात पहिले तुम्ही ज्यूस बनवण्यासाठी लागणारे स्किल्स शिकून घ्या व त्यानंतर ज्यूसचे दुकान टाकण्यासाठी लागणारे सामान गोळा करा. अधिक माहितीसाठी आमची पोस्ट पूर्ण वाचा.

ज्यूसचे दुकान कुठे टाकले पाहिजे?

ज्यूसचे दुकान ज्या ठिकाणावरून दररोजचे हजारो लोक ये जा करतात अशा ठिकाणी टाकले पाहिजे.जसे की हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, बस, स्टँड, सरकारी कार्यालय, कोर्ट इत्यादी.

ज्यूसचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागेल?

सुरू करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 30 हजार ते 1 लाख ते जास्तीत जास्त तुम्ही काय काय करता यावर अवलंबून असणार आहे.

Final Word :-

तुम्हाला व्यवसाय करताना ध्यान द्यायचे आहे की तुम्ही असे ज्यूस बनवा जे की तुम्ही स्वतः एक ग्राहक म्हणून विकत घेऊ शकता. जर तुम्ही ग्राहकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुमचा व्यवसाय नक्कीच चालेल. फळांच्या ज्यूसचा व्यवसाय फार कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करता येईल व या व्यवसायामध्ये 60 ते 70 टक्के प्रॉफिट मार्जिन आहे. तुम्ही या व्यवसायासाठी गर्दीचे ठिकाण शोधा जसे की महाविद्यालय कॉलेज, बस स्टॅन्ड, हॉस्पिटल, गव्हर्नमेंट ऑफिस इत्यादी अशा ठिकाणी जर तुम्ही तुमचा ज्यूस बारचा व्यवसाय सुरू केला तर तुमचा व्यवसाय नक्कीच तुम्हाला चांगले प्रॉफिट मिळवून देईल.👍

Leave a Comment