फ्रेंचाइजी बिजनेस आयडिया मराठी / Franchise Business Ideas In Marathi 2024.
मित्रांनो जर तुम्ही असा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल की ज्यामध्ये ग्राहक तुमच्याकडे आपोआपच यायला लागेल तर तुम्हाला फ्रेंचाईजी बिजनेस करावा लागेल.फ्रेंचाईजी बिजनेसमध्ये तुम्हाला फक्त एखादया नाव झालेल्या व्यवसायाची फ्रेंचाइजी घेऊन तुमचे शॉप सुरू करायचे आहे.अश्या प्रकारच्या व्यवस्यमध्ये तुम्हाला मार्केटिंग करायची गरज पडत नाही आणि ग्राहक शोधत बसावे लागत नाही आणि यालाच फ्रेंचाईजी बिजनेस असे म्हणतात.
फ्रेंचाईजी व्यवसायामध्ये रिलायन्स, डी मार्ट मॅकडॉनल्ड्स डॉमिनोज या कंपन्यांचे ग्राहक कुठे गेले तरी यांच्या शॉप मधूनच खरेदी करतात.आजच्या पोस्टमध्ये आम्ही काही बेस्ट फ्रेंचाईजी माहिती मराठीत घेऊन आलो आहोत पूर्ण भारतभर प्रोफिटेबल बिझनेस करतात. जर तुम्ही या कंपनीचे फ्रेंचाईजी घेतली तर तुमचा व्यवसाय नक्कीच चालेल.
फ्रेंचाइजी व्यवसाय आयडिया मराठी / Best Franchise Business In Marathi 2024.
डी मार्ट फ्रेंचाईजी :-
डी मार्ट कंपनीची स्थापना 2000 साली झाली होती या कंपनीची स्थापना होऊन 22 वर्ष झाले आहे. भारतातल्या मुख्य 72 शहरांमध्ये डी मार्ट च्या एकूण 250 पेक्षा जास्त शाखा आहेत. डी मार्ट एक प्रॉफिटेबल कंपनी आहे आणि डी मार्ट चा जेव्हा शेअर मार्केटमध्ये शेअर आला होता तेव्हा त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता, म्हणजेच यांच्या फ्रेंचाईजी पाया मजबूत आहे.
डी मार्टची फ्रेंचाईजी 25 ते 30 लाखापासून सुरू होते आणि या फ्रेंचाईजीमध्ये तुम्हाला दैनंदिन वापरातील किराणामाल व इतर माल अगदी कमी किंमतीत मिळतो. त्यामुळे डी मार्टची फ्रांचायजी ही प्रॉफिटेबल व्यवसाय आहे. कोणतेही शहरातील डी मार्टच्या स्टोरला खूप जास्त गर्दी असते आणि जर तुम्ही तुमच्या शहरांमध्ये डी मार्टचे स्टोअर ओपन केले तर तुम्ही कमी वेळात जास्त प्रॉफिट कमवू शकता.
ई कार्ट फ्रेंचाईजी :-
ई कार्टचा संपूर्ण भारतात कुरियरचा व्यवसाय आहे. एका शहरात एक पेक्षा जास्त ई कार्टची फ्रेंचाईजी असल्या तरी कुरियर चे काम पूर्ण होत नाही कारण या व्यवसायात लोड फार मोठ्या प्रमाणात असतो. ज्याचे कारण तुम्हाला माहीतच असेल की आजकाल खूप मोठ्या प्रमाणात लोक ऑनलाईन वस्तू मागवतात.
जर तुम्ही ई कार्टची फ्रेंचाईजी तुमच्या शहरासाठी घेतली तर तुम्हाला कुरियर डिलिव्हर करण्यासाठी मुले कामाला ठेवावे लागतील.ई कार्टची फ्रेंचाईजी तुम्हाला 12 ते 14 लाख मध्ये मिळेल. ई कार्टची फ्रेंचाईजी भारतातील प्रत्येक शहरांमध्ये प्रॉफिटेबल आहे.
अपोलो फार्मसी फ्रेंचाईजी :-
अपोलो फार्मसी मेडिकल शॉप आहे जिथे सर्व प्रकारचे औषध मिळतात.अपोलो फार्मसीची फ्रेंचाईजी तुम्हाला पाच ते दहा लाख रुपये पर्यंत मिळेल.मेडिकल फिल्डमध्ये एक ब्रँडेड अपोलोची फ्रेंचाईजी आहे.आणि मेडिकल शी रिलेटेड फ्रेंचाईजी तुम्हाला कधी नुकसान देणार नाही.ही फ्रेंचाईजी उघडायला तुम्हाला 200 ते 250 स्क्वेअर फुट जागेची आवश्यकता पडेल.
कल्याण ज्वेलर्स फ्रेंचाईजी :-
भारताचा आज ज्वेलरीची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.2022 मध्ये लग्नांमध्ये सर्वात जास्त ज्वेलरीची खरेदी झाली होती. आणि भारतात ग्राहकांची ज्वेलरी खरेदी करण्याची क्षमता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.कल्याण ज्वेलर्सची फ्रेंचाईजी फायदेशीर आहे कारण की लग्नांमध्ये खर्च होतो व त्यातील सर्वात जास्त खर्च हा ज्वेलरीवर होतो.
कल्याण ज्वेलर्स फ्रेंचाईजी घेण्यासाठी तुम्हाला 50 लाख ते एक करोड पर्यंत इन्व्हेस्टमेंट करावी लागेल.कल्याण ज्वेलर्स फ्रेंचाईजीसाठी तुम्हाला 1000 ते 1500 स्क्वेअर फुट जमिनीची आवश्यकता असते. पुढील येणाऱ्या काळात लग्नांमध्ये ज्वेलरीची क्रेझ आणखीन वाढेल त्यामुळे कल्याण ज्वेलर्सची फ्रेंचाईजी तुमच्यासाठी प्रॉफिटेबल होऊ शकते.
अमूल फ्रेंचाईजी :-
तुम्हाला माहितीच असेल अमूल दूध आणि दूधजन्य पदार्थांमध्ये भारतातील एक मोठा ब्रँड आहे.अमूलच्या व्यवसायात दही दूध तूप इत्यादी अनेक प्रॉडक्ट अमूलचे आहेत.अमूल फ्रेंचाईजी अगदी कमी किंमतीत म्हणजे 2 लाख रुपयांत घेऊ शकता जी की इतर मोठ्या फ्रेंचाईजी ब्रँड पेक्षा फार कमी आहे.
अमूलची फ्रेंचाईजी फार फेमस आहे त्यामुळे ग्राहक पहिल्या दिवसापासून खरेदीला येतात.भारतात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर घरात अमूलचे दूध,दही,तूप वापरले जाते.
रिलायन्स फ्रेश फ्रेंचाईजी :-
रिलायन्स भारतातील सर्वात मोठे व्यापारी मुकेश अंबानी यांची कंपनी आहे तसेच त्यांचा रिटेलमध्ये खूप व्यवसाय आहे.रिलायन्स फ्रेशमध्ये दैनंदिन वापराच्या सर्व वस्तू मिळतात. दैनंदिन वापरात येणारे दाळी मसाले तेल खाण्याचे पदार्थ पॅकिंग फूड ड्रिंक्स चॉकलेट बिस्कीट इत्यादी जीवनावश्यक सर्व वस्तू रिलायन्स फ्रेशमध्ये मिळतात.
भारताच्या ज्यापण शहरात रिलायन्स फ्रेशची फ्रेंचाईजी आहेत तिथे खूप जास्त गर्दी असते.रिलायन्स फ्रेशची फ्रेंचाईजी 25 ते 30 लाखांपासून सुरू होते. जर तुमचे एवढे बजेट असेल तर तुम्ही नक्की रिलायन्स फ्रेशची फ्रेंचाईजी घेऊ शकतात.
लॅक्मे फ्रेंचाईजी :-
लॅक्मे भारताचा कॉस्मेटिक ब्रँड आहे जो महिलांसाठी खुप सारे कॉस्मेटिक प्रॉडक्ट बनवतात.लॅक्मे एक प्रसिद्ध कॉस्मेटिक ब्रँड आहे त्यामुळे खूप साऱ्या महिला लॅक्मेचे ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करतात.त्यामुळे तुम्ही लॅक्मेची फ्रेंचाईजी घेऊन चांगले प्रॉफिट कमवू शकतात.
लॅक्मेची फ्रेंचाईजी तुम्हाला पंचवीस ते तीस लाखापर्यंत तुम्हाला मिळून जाईल.
हिमालया फ्रेंचाईजी :-
हिमालया आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवण्यासाठी ओळखली जाते.भारतात झपाट्याने हिमालयाचे स्टोअर्स उघडत आहे कारण भारतात आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी लोकांचा कल आहे. मित्रांनो हिमालया सोबत साडेचार लाख डॉक्टर संपूर्ण भारतभर जोडले आहेत. त्यामुळे या प्रकारचे आयुर्वेदिक डॉक्टर हे हिमालयाचे प्रॉडक्ट हे त्या पेशंटला घेण्यासाठी सजेस्ट करत असतात.जर तुमच्याकडे यांची फ्रेंचाईजी असेल तर डॉक्टरांनी पाठवलेले तुमच्याकडेच येतील.
हिमालयाची फ्रेंचाईजी जुनी फ्रेंचाईजी आहे आणि या फ्रेंचाईजीची 25 ते 30 लाखापासून सुरुवात होते.