शेती व्यवसाय माहिती मराठी / Sheti Vyavsay Information In Marathi.
आज पण भारतातील 58% लोक शेतीवर अवलंबून आहेत. इतकेच नाही तर भारत जगातील टॉप टेन एग्रीकल्चर देशामध्ये येतो आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा शेतीतून येतो. यातून तुम्ही अंदाज लावू शकता येणाऱ्या काळात शेती व शेती पूरक व्यवसाय किती झपाट्याने वाढणार आहेत. अशा मध्ये जर तुम्ही शेतीपूरक व्यवसाय करण्याचे ठरले असेल तर आजच्या पोस्टमध्ये आम्ही शेतीपूर्वक व्यवसायाच्या काही आयडिया घेऊन आलो आहोत.
शेतीपूरक व्यवसायाची माहिती / Agriculture Business Ideas In Marathi.
1)मशरूमची शेती:-
जर तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये गेलात आणि व्हेज मेनूत काय आहे विचारले तर तुम्हाला मशरूम चे नाव नक्की ऐकायला मिळेल. मशरूम ची शेती आजकाल खूप जास्त प्रसिद्ध झाली आहे. पूर्ण भारतच नाही तर संपूर्ण जगात मशरूम चा वापर वाढत आहे, कारण मशरूम मध्ये प्रोटीनची मात्रा जास्त असते त्यामुळे मशरूम व्हेजिटेरियन लोकांसाठी एक चांगले अन्न आहे.
मशरूमची शेती ही सीजनल असते आणि मशरूमला सप्टेंबर-ऑक्टोंबर पासून मार्चपर्यंत उगवले जाते. मशरूमला उगवण्यासाठी 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची आवश्यकता असते. यामुळे या शेतीला बंद जागेत केले जाते जर तुम्हाला मशरूम शेती उघड्या मध्ये करायचे असेल तर तुम्हाला तापमान नियंत्रण करण्यासाठी त्या शेतीभोवती कापडाने किंवा इतर पद्धतीने तापमान थंड ठेवण्याचे सुविधा करावी लागेल.
या मशरूम शेतीला तुम्ही साठ हजार ते एक लाख रुपये इन्वेस्ट करून स्टार्ट करू शकतात. तुमचे उत्पन्न हे तुम्ही उगवलेल्या मशरूमच्या संख्येवर अवलंबून असेल त्यामुळे तुम्ही किती मोठ्या जागेत शेती करता यावर तुमचे उत्पन्न अवलंबून असणार आहे.
2)बांबूची शेती :-
बांबूला मेरिकल ग्रास म्हणून देखील ओळखले जाते, कारण की याचा उपयोग खूप सारे प्रॉडक्ट बनवण्यासाठी होतो. जसे की बांबू टूथ ब्रश,पाण्याची बॉटल,बासुरी,खुर्च्या,टेबल,बांबूचे घर,इत्यादी गोष्टीसाठी बाबूंचा मोठा वापर होतो.बांबूला प्लास्टिक आणि लाकडांचा अल्टरनेट म्हणून वापरण्यात येऊ शकते.याच कारणांमुळे बांबूची मागणी मागच्या काही वर्षांत वाढताना दिसत आहे.वाढत्या मागणीमुळे आज खूप जण बांबू शेती करण्याचा विचार करत आहे.
बांबूला तुम्ही कोणत्याही मातीमध्ये उगवू शकतात.बांबूचे सर्वात जास्त उत्पादन मान्सूनच्या वेळेस होते.बांबूच्या झाडाला सुरुवातीला जास्त पाणी लागते.बांबूच्या एका झाडाची जवळपास किंमत ही 20 रुपये इतकी असते.झाड लावल्यानंतरच्या 4 ते 5 वर्षात झाडाला बांबू यायला सुरुवात होते.मार्केटमध्ये एक बांबू तुम्ही कमीत कमी 60 रुपयाला विकू शकतात.पहिल्या 4 वर्षात बांबू फार कमी उत्पादन देतात पण त्यानंतर ते अगदी झपाट्याने वाढ घेतात.
बाबूं शेती करायची पध्दत
बांबूला मुख्यतः तीन प्रकारे उगवले जाते,पहिल्या पद्धतीमध्ये बी लावून उगवले जाऊ शकते.पण बांबूचे बी मार्केटमध्ये लवकर उपलब्ध होत नाही.
बांबूला लावण्याची दुसरी पध्दत म्हणजे बांबूचे मुळे मातीत लावणे.तुमच्या आसपास कोणाच्या शेतात बांबू असेल तर त्याचे मुळे काढून तुम्ही तुमच्या शेतात लावू शकतात.
तिसऱ्या बांबूला लावण्याची पध्दत म्हणजे टिशू पध्दत! ज्यामध्ये बांबूच्या झाडांना शेतीत लावले जाते.यामध्ये बांबू बरोबर शेतकरी दुसरे पीक पण घेतात यामुळे त्यांचे प्रॉफिट जास्त होते.
3)गांडूळ खत :-
गांडूळ खत हे एक प्रकारचे “ऑरगॅनिक खत” आहे.गांडूळ खताला शेतात वापरतात ज्यामुळे पीक जास्त येते.या नैसर्गिक खतामूळे शेतामध्ये कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया किंवा बुरशी पिकाला लागत नाही.युरिया सारखे खत हे अनैसर्गिक असते त्यामुळे अशा प्रकारच्या खतांचा वापर करून निघालेले अन्न खाऊन खूप सारे आजार होत असतात.या सगळया वर उपाय म्हणजे गांडूळ खतांचा जास्तीत जास्त वापर करणे!
गांडूळ खतांची शेती मुख्यतः शेण आणि गांडूळ यामध्ये होते.या शेतीत गांडूळ शेणाला खाते आणि त्यांनंतर त्याचे रूपांतर गांडूळ खतांमध्ये होते.गांडूळ खत साधारण खतापेक्षा 8% जास्ती असरदार असते त्यामुळे याची खूप मोठी डिमांड आहे.तुम्ही याशेतीत तुम्ही खता बरोबर गांडूळपण विकू शकतात. गांडूळ खताची निर्मिती तुम्ही बाराही महिने करू शकतात याचा कोणता सिझन नसतो.
4)दुग्धव्यवसाय :-
तुम्हाला सुरुवातीला 70 ते 80 गायींची गरज नाहीये तुम्ही पाच ते दहा गाया घेऊन दुग्ध व्यवसाय व्यवसाय सुरू करू शकतात. सुरुवातीला तुम्ही तुमच्या घरच्या आसपास दूध विकू शकतात व तुमचे दुधाचे उत्पादन जास्त होईल तेव्हा तुम्ही त्याचे तूप बनवून सुद्धा विकू शकतात.दूध प्रत्येक जण पितो त्याचबरोबर चहा कॉफी तसेच इतर खूप दुधजन्य पदार्थांमध्ये दुधाचा वापर होतो. दुध हे नेहमी चालणारे शेतीपूरक व्यवसाय आहे त्यामुळे दुधाला नेहमीच मार्केटमध्ये डिमांड राहील.
मधमाशी पालन :-
मध हे एक पौष्टिक पदार्थ आहे त्याचबरोबर दाहक-विरोधी गुणधर्म मधामध्ये असतात.याच गुणधर्मामुळे मध लवकर खराब होत नाही.मधमाशी पालन आपल्या भारतात मोठ्या प्रमाणावर होत नाही त्यामुळे या व्यवसायात स्पर्धा फार कमी आहे.
मधमाशी पालन व्यवसाय कसा करावा?
मधमाशी पालनचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला मधमाशा ज्या बॉक्समध्ये ठेवल्या जातात ते बॉक्स विकत घ्यावे लागतील.
मधमाशी पालन बॉक्स तुम्हाला अंदाजे 1000 ते 1500 रुपयाला पडेल.
तुम्ही सुरुवातीला 20 ते 30 बॉक्स घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला बऱ्या पैकी नफा होईल.
मधमाशी व्यवसायातून मधमाशी विष आणि रॉयल जेली ही तुम्ही विकू शकतात,याची किंमत ही मधा पेक्षा जास्त असते.
खत आणि कृषि उत्पादने :-
प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीसाठी खत व कीटकनाशकांची व केमिकलची गरज असते. जर या विषयांमध्ये तुम्हाला थोडी माहिती असेल तर तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.यामध्ये तुम्ही खते आणि रोप बियाणाची अशा ठिकाणी शॉप सुरु करू शकता ज्या भागात शेती मोठ्या प्रमाणात होते.
फक्त ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला शेती विषयी चांगली माहिती हवी.कोणता कीटकनाशक कोणत्या पिकाच्या रोगावर वापरले जाते.हा व्यवसाय खूप जास्त प्रॉफिट देणारा आहे कारण कीटकनाशकांची किंमत जास्त असते.या व्यवसायासाठी तुम्हाला राज्य सरकारकडून एक सर्टिफिकेट घ्यावा लागेल.
Agriculture business ideas in maharashtra in marathi
मँगो फार्मिंग :-
जगातील आब्यांच्या उत्पादनापैकी फक्त भारतच 57% उत्पादन करतो.महाराष्ट्र,उत्तरप्रदेश,गुजरात, तेलंगणा,बिहार, राज्यात मोठ्या प्रमाणावर आंब्याची शेती होते.आंब्याचे सिजन एप्रिल पासून सुरु होऊन जून-जुलै पर्यत राहते.तुम्ही तुमच्या शेतात आंब्याचे झाड लावण्याबरोबर दुसरे पिके पण घेऊ शकतात.
आब्यांच्या चांगल्या उत्पादनासाठी पहिले 1 ते 2 वर्ष तुम्हाला चांगली काळजी घ्यावी लागेल.यामध्ये वेळेवर पाणी आणि चांगले खत देणे इत्यादी काम करावे लागतात.तुमचे फळाचे उत्पादन किती असू द्या त्यामध्ये तुम्हाला नफा होईल,कारण संपूर्ण भारतात उन्हाळ्यात आब्यांची खूप मोठी मागणी असते.
कोरफड शेती :-
आजकाल जेवढे पण शाम्पू,साबण,कॉस्मेटिक,ब्युटी प्रॉडक्ट आहेत त्या सगळ्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला कोरफड असल्याचे नक्की दिसेल कोरफडचे रोप असे आहे की ते प्रत्येक सिजन मध्ये व्यवस्थित राहते.
तुम्हाला फक्त एकदा कोरफडचे रोपटे विकत घ्याचे असतात आणि एक कोरफड रोपट्याला 3 रुपये लागतात.एकदा कोरफडचे रोप तयार होईल त्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही ते 17 ते 20 रुपयांपर्यन्त विकू शकतात.जर तुम्ही एक एकर मध्ये 10000 रोप लावतात तर तुमचा 30000 रुपये खर्च येतो.रोप तयार होयला 7 ते 8 महिने लागतात त्यांनतर तुम्ही रोप 17 रूपयाला जरी विकले तर तुमचे 170000 रुपये होतात.
तुळशी शेती :-
तुळशीला भारतात पूजतात आणि प्रत्येक घरात एक तरी तुलशी असते.तुळशीमध्ये खूप साऱ्या आयुर्वेदिक गुणधर्म असतात.त्यामुळे तुळशीचा वापर औषध,सौंदर्यप्रसाधने,आयुर्वेद मध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.याशिवाय तुळशीचे रोप आपल्या आसपास रात्रीच्या वेळेस ऑक्सिजन पसरवते.या सर्व गुणधर्मामुळे तुळशी प्रत्येक घरात लावली जाते.
तुळशी शेती व्यवसाय कसा करतात?
अश्या मध्ये जर तुम्ही तुळशीची शेती केली तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात.तुळशीच्या शेतीसाठी एप्रिल ते ऑक्टोबर महिन्याचा सगळ्यात चांगला वेळ आहे.
तुम्ही शेतीच्या मध्ये तुळशीचे बी लावून सुद्धा लागवड करू शकता किंवा तुम्ही रोपटे विकत घेऊन ते सुद्धा लावू शकतात.
तुळशीचा उपयोग बऱ्याच साऱ्या औषधांमध्ये होतो त्यामुळे यामध्ये केमिकल खतांचा वापर करू नये.
तुळशीपासून 2 प्रकारे पैसे कमावले जातात,पहिले त्याचा बी पासून आणि दुसरे त्याचा पानांपासून बनणाऱ्या तेलापासून होते.
तुळशीच्या बिया मार्केटमध्ये 150 रुपये प्रति किलोने विकले जातात.आणि तुळशीच्या पानांचे तेल 700 रुपये लिटर च्या भावाने विकते.