Etsy माहिती मराठीत | Etsy Information In Marathi 2024.

Etsy म्हणजे काय? / What Is Etsy In Marathi?

Etsy Information In Marathi

Etsy ही एक इंटरनेशनल मार्केट आहे जिथे तुम्ही कोणत्याही प्रकारची फिजिकल आणि डिजिटल प्रॉडक्ट विकू शकता. Etsy प्लॅटफॉर्ममधून तुम्ही घर बसल्या खूप पैसे कमवू शकता. आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही Etsy विषयी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

ज्यामध्ये आम्ही तुम्हाला Etsy म्हणजे काय? Etsy कसे कार्य करते? Etsy प्लॅटफॉर्मवर महिन्याला किती ट्रॅफिक आहे? Etsy वर शॉप सुरू करण्यासाठी कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? Etsy मार्केटबद्दल तुमचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत, ते सर्व आजच्या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.

Etsy माहिती मराठीत / Etsy Information In Marathi.

Etsy ही एक ई-कॉमर्स वेबसाइट आहे जी हँडमेड वस्तू, विंटेज आणि युनिक वस्तूंसाठी जागतिक मार्केट म्हणून काम करते. Etsy हे स्वतंत्र विक्रेते, कारागीर आणि शिल्पकारांना त्यांची प्रॉडक्ट प्रदर्शित करण्यासाठी आणि जगभरातील खरेदीदारांना थेट विक्री करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. Etsy च्या मार्केटप्लेसवर दागिने, कपडे, गृहसजावट, कला, हस्तकला, डिजिटल प्रॉडक्ट आणि बरेच प्रॉडक्ट जगभरात कोणी कुठूनही विक्री किंवा खरेदी करू शकते.

Etsy वर तुमचे प्रॉडक्ट विक्री करण्यासाठी ते क्रिएटिव्ह  आणि युनिक असणे आवश्यक आहे आणि विक्रेत्यांना त्यांचे ऑनलाइन व्यवसाय स्थापित करण्यात आणि वाढविण्यात मदत करण्यासाठी Etsy सपोर्ट देण्याचे काम करते.

Etsy वर कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट विकता येतात?

1. हाताने बनवलेल्या वस्तू / Handmade Goods : हाताने तयार केलेली प्रॉडक्ट म्हणजे कारागीर उत्पादने, जसे की दागिने, कपडे, उपकरणे, घराची सजावट प्रॉडक्ट, मेणबत्त्या, आंघोळ आणि सौंदर्य उत्पादने, कलाकृती आणि मातीची भांडी इत्यादी.

2. विंटेज वस्तू / Vintage Items : खूप वर्षापूर्वीच्या जुन्या वस्तूंना विंटेज उत्पादन किंवा विंटेज प्रॉडक्ट असे म्हणतात. किमान 20 वर्षे जुन्या वस्तू, ज्यात विंटेज कपडे, ॲक्सेसरीज, होम फर्निशिंग, संग्रहणीय वस्तू आणि पुरातन सजावट यांचा विंटेज वस्तूमध्ये समावेश होतो.

3. हस्तकला / Craft Product : हस्तकलामध्ये वापरले जाणारे साहित्य जसे की कापड, मणी, बटणे, धागा, कागदाच्या वस्तू, लाकडावरील डिजाईन इत्यादी वापरून क्राफ्ट प्रॉडक्ट बनवले जातात.

4. डिजिटल उत्पादने / Digital Products : प्रिंट करता येतील अशी कला, नमुने, टेम्पलेट्स, क्लिप आर्ट, डिजिटल आमंत्रणे आणि इतर युनिक डिजिटल डिझाइन्स सारख्या डाउनलोड करण्यायोग्य डिजिटल आयटमचा यात समावेश आहे.

5. वैयक्तिकृत आणि कस्टमाईज केलेली उत्पादने / Personalized and Customized Products : वैयक्तिकृत दागिने, कोरीव वस्तू, कस्टमाईज कपडे आणि मोनोग्राम, तयार केलेल्या भेटवस्तू यावर नावे, आद्याक्षरे किंवा विशिष्ट डिझाइनसह कस्टमाईज केलेल्या प्रॉडक्टचा या कॅटेगिरीमध्ये समावेश होतो.

6. कला आणि संग्रहणीय वस्तू / Art and Collectibles: ओरिजनल कलाकृती, मुद्रिते, चित्रे, शिल्पे, छायाचित्रण आणि नाणी, स्टॅम्प, ट्रेडिंग कार्ड आणि दुर्मिळ संस्मरणीय वस्तू इत्यादी

Etsy प्लॅटफॉर्मवर प्रॉडक्ट विकण्यासाठी सर्वात पहिली रिक्वायरमेंट म्हणजे तुमचे प्रॉडक्ट युनिक असले पाहिजे. उदाहरणार्थ, एक कॉफी मग आहे त्यावर तुम्ही काही युनिक डिजाईन काही अनोखी रचना तयार केली तर, तुम्ही तो प्रॉडक्ट Etsy वर विकू शकता, म्हणजे तुम्ही हॅन्डमेड प्रॉडक्ट Etsy प्लॅटफॉर्मवर विकू शकता.

Etsy वर खूप साऱ्या प्रकारचे प्रॉडक्ट तुम्ही विक्री करू शकता पण अगदी फ्रीमध्ये डिजिटल प्रॉडक्ट तयार करून विक्री करू शकतात.

डिजिटल प्रॉडक्टचा अर्थ जसे की डिजिटलपणे डाउनलोड केले जाऊ शकते? उदाहरणार्थ तुम्ही ग्राफिक डिझायनर आहे, मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही काही डिझाईन्स बनवून विकू शकता उदाहरणार्थ, इन्स्टाग्रामवर पोस्ट, इंस्टाग्राम स्टोरी, युनिक डिजाईन, प्रेझेन्टेशन, गुगल शीट इत्यादी असे बऱ्याच प्रकारचे डिजिटल प्रॉडक्ट असतात ते तुम्ही बनवून चांगल्या किंमतीवर विक्री शकतात.

Etsy कसे काम करते?

सोप्या पद्धतीने सांगायचे झाले तर Etsy विक्रेते आणि खरेदीदारच्यामध्ये मध्यस्थी करण्याचे काम करते. उदाहरण जर तुम्ही एक पेंटर असाल तर तुम्ही तुमची पेंटिंगचे डिजिटल प्रॉडक्ट Etsy वर ऑनलाइन रजिस्टर करू शकतात. त्यांनतर तुमच्या पेंटिंगचे प्रॉडक्ट ज्या माणसाला घरात सजवायला पेंटिंग हवी आहे किंवा ज्याला पेंटिंग पाहायला आवडते त्याला तुमचे पेंटिंग दाखवायचे काम Etsy प्लॅटफॉर्म करते, जर त्या खरेदीदाराला ती पेंटींग आवडली तर खरेदीदार व विक्रेतामध्ये Etsy मध्यस्थी करते व विक्रेत्याला त्याच्या प्रॉडक्टचे पैसे मिळतात. प्रॉडक्ट खरेदीदारला आपले प्रॉडक्ट मिळते व काही कमिशन Etsy प्लॅटफॉर्म ठेऊन घेते.

मी Etsy वर विक्री करू शकतो का?

तुम्ही कोणत्याही शहरातून, कोणत्याही गावातून, कोणत्याही देशातले आहात, तुम्ही Etsy वर विक्री करू शकता. Etsy देखील सध्याच्या वेळेस 234 देशांमध्ये कार्यरत आहे. तुम्ही कोणत्याही देशाचे आहात, कोणत्याही शहराचे आहात याने काहीही फरक पडत नाही, तुम्ही तिथून विक्री किंवा खरेदी करू शकता. कोणत्याही प्रकारची प्रॉडक्ट जसे की डिजिटल प्रॉडक्ट असो किंवा फिजिकल प्रॉडक्ट तुम्ही त्याची विक्री करू शकता फक्त अट एकच आहे की तुमचे प्रॉडक्ट युनिक असले पाहिजे.

Etsy वर किती लोक खरेदी करतात?

Etsy च्या वेबसाईटवर ग्लोबल रँकबद्दल पाहायचं झालं तर ते जगभरात 55 व्या जागतिक रँकमध्ये येतात आणि देशाच्या रँकमध्ये युनायटेड स्टेट्समध्ये ते 27 व्या स्थानावर आहे. ई-कॉमर्स खरेदीच्या कॅटेगिरीमध्ये Etsy चौथ्या क्रमांकावर आहे आणि प्रत्येक विक्रेत्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्या प्लॅटफॉर्मवर विक्री करत आहे तेथील मासिक भेटी किती आहेत.

Etsy वेबसाईटवर दिवसेंदिवस विक्रीसाठी भेट देणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. Etsy वर महिन्याला भेट देणाऱ्या लोकांची संख्या 450.30 मिलियन पर्यंत पोहोचली आहे. त्यांचा वेबसाईटवर एव्हरेज विजिट ड्यूरेशन 6 मिनिट 26 सेकंद इतका आहे, जो की खूप चांगला आहे.

मुळात इथे सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की सर्वात जास्त भेट देणारे ग्राहक युनायटेड स्टेट्सचे आहेत, जे 60 टक्के आहेत, जी खूप मोठी संख्या आहे.

Etsy मधून पैसे कसे कमवावे?

1. कॅटेगरी ओळखा: तुम्हाला Etsy वर कोणत्या प्रकारच्या उत्पादनांची विक्री करायची आहे ते ठरवा. तुमचे ग्राहक टारगेट करण्‍यासाठी त्यांच्या आवडी, आवश्यकता आणि बाजारातील मागणीचा विचार करा.

2. Etsy खाते तयार करा: Etsy च्या वेबसाइटला (www.etsy.com) भेट द्या आणि त्यावर तुमचे खाते सुरू करण्यासाठी “Sell on Etsy” वर क्लिक करा. तुमचे नाव, ईमेल पत्ता आणि पासवर्डसह आवश्यक तपशील भरा.

3. तुमचे दुकान सेट करा: तुमचे खाते तयार झाल्यानंतर, तुम्हाला तुमचे दुकान सेटअप करण्यासाठी सांगितले जाईल. तुमच्या ब्रँडचे नाव व लोगो आणि तुम्ही विक्री करत असलेली उत्पादने दर्शवावी लागतील. तुम्हाला दुकानाची भाषा, चलन आणि स्थान या गोष्टींची माहिती भरावी लागणार आहे.

4. प्रॉडक्ट लिस्ट करा: तुमच्या दुकानासाठी प्रॉडक्ट सूची तयार करण्यासाठी “Add a Listing” वर क्लिक करा. प्रत्येक आयटमसाठी उच्च-गुणवत्तेचे फोटो, तपशीलवार वर्णन आणि अचूक किंमत टाका. तुम्ही शिपिंगची माहिती तसेच इनव्हेंटरीची माहिती टाकू शकतात.

5. पेमेंट पद्धती सेट करा: ग्राहकांकडून पेमेंट प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पेमेंट पद्धती सेट करणे आवश्यक आहे. Etsy तुम्हाला पेमेंट्स स्वीकारण्यासाठी विविध पर्याय देतात, जसे की तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि Etsy भेट कार्ड यांसारखे विविध पेमेंट पर्याय स्वीकारण्याचा ऑप्शन देतात. तुमचे बँक खाते किंवा PayPal लिंक करण्यासाठी दिलेल्या माहितीनुसार माहिती भरणे आवश्यक आहे.

6. शिपिंग पर्याय निश्चित करा: तुमच्या शिपिंग पद्धती आणि दर ठरवा. लक्ष्यित ग्राहकांनुसार तुम्ही भारतामध्ये देशांतर्गत शिपिंग किंवा आंतरराष्ट्रीय शिपिंग ऑफर करणे निवडू शकता. तुम्ही चांगल्या शिपिंग कॅरियर वापरा आणि शिपिंग खर्चाची अचूक गणना करा.

7. तुमचे दुकान ऑप्टिमाइझ करा: तुमचे प्रॉडक्ट आणि दुकानाची माहिती ऑप्टिमाइझ करून तुमच्या दुकानाची दृश्यमानता / विसिबिलिटी तुम्ही सुधारू शकतात. शोध रँकिंग सुधारण्यासाठी प्रॉडक्टच्या शीर्षक आणि वर्णनांमध्ये संबंधित कीवर्ड तुम्ही वापरू शकतात. तुमच्या दुकानाचे स्वरूप कस्टमाईज करा आणि ब्रँडिंग चांगली करण्यासाठी दुकानाचा बॅनर किंवा लोगो चांगला लावा.

8. तुमच्या दुकानाचा प्रचार करा: तुमच्या Etsy दुकानाचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि इतर सोशल मीडियाचा वापर तुम्ही करू शकतात. तुमचे प्रॉडक्ट दाखवण्यासाठी आणि संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट करण्यासाठी Instagram, Facebook किंवा Pinterest सारख्या प्लॅटफॉर्मवर खाती तयार करा. प्रॉडक्ट व्हिजीबिलिटी वाढवण्यासाठी तुम्ही जाहिराती चालवू शकता.

9. चांगली ग्राहक सेवा प्रदान करा: ग्राहकांच्या चौकशीस त्वरित प्रतिसाद द्या आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याचा प्रयत्न करा. तुमचा संवाद व्यावसायिक आणि मैत्रीपूर्ण असल्यास तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. रिपीट खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी सवलत, विशेष ऑफर किंवा प्रोत्साहन देण्याचा विचार तुम्ही करू शकतात.

10 डेटाचे विश्लेषण करा: विक्री, ग्राहक फीडबॅक आणि विश्लेषणासह तुमच्या दुकानाच्या कामगिरीला नियमितपणे पाहून तुम्ही त्यात सुधारणा करू शकतात. तुम्ही गोळा करत असलेल्या डेटाच्या आधारे तुमच्या प्रॉडक्टच्या ऑफर, किंमती किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करा.

लक्षात ठेवा की Etsy वरील यशासाठी वेळ आणि मेहनत लागते. एक चांगला ब्रँड तयार करण्यासाठी उच्च-गुणवत्तेची उत्पादने प्रदान करणे आणि चांगले ग्राहक संबंध राखणे या प्लॅटफॉर्मवर पैसे कमवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Etsy वर प्रॉडक्ट विकण्यासाठी कोण कोणत्या आवश्यकता आहे?

तुम्ही ठरवले की हँड मेड बनवलेले प्रॉडक्ट विकायचे आहे का डिजिटल प्रॉडक्ट विकायचे आहे. तेव्हा सर्वात मोठा प्रश्न येतो की, मला समजत नाही, विक्रीसाठी काय आवश्यकता आहेत?

जर तुम्ही पूर्ण बिगनर असाल तर आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे. एखाद्या छोट्यापासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट लागणार आहे त्याची माहिती खाली दिली आहे.

1) लॅपटॉप आणि चांगले इंटरनेट कनेक्शन

Etsy वर शॉप उघडण्यासाठी आपल्याला लॅपटॉप आणि चांगले इंटरनेट कनेक्शन ही पहिली आवश्यकता आहे. आता तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु तुम्ही विचार करत असाल की मी फोनवरूनच Etsy वर शॉप चालवू शकतो का? तर हे देखील शक्य आहे की तुम्ही फोनवरून Etsy वर घरून काम करू शकता.

तुम्ही लॅपटॉप ऐवजी फोनमधून सुद्धा Etsy वर काम करू शकतात परंतु चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी तुम्हाला लॅपटॉपची आवश्यकता पडणार आहे.

दुसरी गोष्ट तुमच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन असले पाहिजे. Etsy वर शॉप चालवण्यासाठी तुम्हाला फारसे इंटरनेटची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे ही काही मोठी गोष्ट नाही. लॅपटॉप आणि चांगले इंटरनेट कनेक्शन या दोन गोष्टी तुमच्याकडे असाव्यात आणि आम्हाला आशा आहे की तुमच्याकडे या गोष्टी 100% असतील.

2) नवीन ईमेल आईडी आणि मोबाईल नंबर

आम्ही इथे नवीन ईमेल आईडी सांगितला आहे पण तुम्ही जुना ईमेल आईडी सुध्दा वापरू शकतात. आम्ही तुम्हाला नवीन ईमेल आईडी बनवुन वापरण्याचा सल्ला देतो.

अगदी नवीन फोन नंबरची गरज नाही कारण त्याला नवीन किंवा जुना नंबर असा काही फरक पडत नाही. तुम्हाला कॉल स्वीकारण्यासाठी मोबाईल नंबरची आवश्यकता पडणार आहे.

3) Paypal बिझनेस अकाउंट

Paypal चे बिझनेस अकाउंट Etsy वर शॉप ओपन करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. PayPal व्यवसाय खाते आवश्यक आहे कारण त्याशिवाय तुमची वेरिफिकेशन केली जाणार नाही. तुम्ही जर Paypal चे अकाउंट ओपन केले नसेल तर ते ओपन करून घ्या, ऑनलाईन Paypal चे अकाउंट ओपन करणे खूप सोपे आहे.

4) आधार कार्ड आणि पॅनकार्ड

आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही डॉक्यूमेंट तुम्हाला आयडेंटी व्हेरिफिकेशनसाठी लागेल.आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे डॉक्यूमेंट सर्वांकडे असते त्यामुळे तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी प्रॉब्लेम येणार नाही.

5) डेबिट कार्ड आणि बँक खाते

आता इथे अनेकांना प्रश्न पडतो की Etsy वर क्रेडिट कार्डची आवश्यकता पडणार आहे का? तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असण्याची गरज नाही, क्रेडिट कार्ड नसले तरीही तुम्ही Etsy वर काम करू शकतात आणि पैसे कमवू शकता.

क्रेडिट कार्डची आवश्यकता नसली तरी तुमच्याकडे इंटरनॅशनल डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे मास्टर कार्ड किंवा विजा कार्ड असले पाहिजे रूपे डेबिट कार्ड चालणार नाही, कारण ते फक्त भारताच चालते. जर तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल आणि ते आंतरराष्ट्रीय असेल तर तुम्ही Etsy वर अकाउंट ओपन करू शकता.

दुसरे बँक खाते असणे आवश्यक आहे, यामध्ये तुम्हाला फक्त आंतरराष्ट्रीय पेमेंट सक्षम करावे लागेल. तुमच्या बँक आकाउंटचे अँप असेल, त्यामध्ये जाऊन तुम्ही इंटरनॅशनल पेमेंटचा ऑप्शन एनेबल करू शकता.

6) जीएसटी नंबर

जर तुमच्याकडे फिजिकल प्रॉडक्ट सेलसाठी असतील तरच तुम्हाला जीएसटी नंबर लागेल. जसे की तुम्हाला पर्सनलाइज्ड नोटबुक सेल करायचे असेल तर तुम्हाला जीएसटी नंबरची आवश्यकता पडेल. तुम्ही जे तुमच्या प्रॉडक्टचे पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी तुम्हाला जीएसटी नंबर लागेल.

जर तुमचे डिजिटल प्रॉडक्ट असेल तर तुम्हाला जीएसटी नंबरची आवश्यकता पडणार आहे. डिजिटल प्रॉडक्ट ग्राहक डाऊनलोड करून वापरू शकतात, त्यामुळे त्या ठिकाणी जीएसटी नंबरची आवश्यकता पडत नाही.

7) प्रॉडक्ट बनवत असतांनाचे फोटो

जर तुम्ही तुमचे फिजिकल प्रॉडक्ट बनवत असाल, तर त्या प्रॉडक्टचे तुमचे फोटो काढून ठेवा,जेव्हा तुमच्या प्रॉडक्टचे व्हेरिफिकेशन होईल तेव्हा ते फोटो उपयोगी येईल.

तुम्ही जर डिजीटल प्रॉडक्ट बनवत असाल, मग तुम्ही जो काही डिजीटल प्रॉडक्ट Canava किंवा फोटोशॉपने बनवत असाल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या.

Leave a Comment