माझा आवडता विषय मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh In Marathi.

माझा आवडता विषय मराठी निबंध मराठी / Maza Avadta Vishay Marathi Nibandh short.

मी ज्या शाळेत शिकायला जातो तिथे अनेक विषय शिकवले जातात, पण त्यापैकी मराठी हा माझा सर्वात आवडता विषय आहे. आमच्या मराठीच्या शिक्षक बाई खूप छान शिकवतात. मराठीच्या पुस्तकात छान छान गोष्टी आणि कविता आहेत, ज्यामुळे आम्हाला शिकताना वेगळीच मजा येते. आमच्या बाई कविता शिकवताना वेगवेगळ्या सुंदर चाली लावतात आणि आम्हाला सुध्दा कविता मोठ्याने म्हणायला सांगतात, त्यामुळे आम्ही मराठीच्या तासाला कविता गुणगुणतो त्यामुळे आमच्या कविता तोंडपाठ झाल्या आहेत.

मराठी विषयाच्या धड्यांमधून अनेक छान गोष्टी शिकायला मिळतात. गोष्टी सांगताना बाई नेहमी आम्हाला मनोरंजकपणे सांगतात, ज्यामुळे शिकण्याचा उत्साह सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाढतो. मला मराठी गोष्टी वाचण्याचा छंद आहे. मराठी भाषा आणि तिचे विविध साहित्य मला नेहमीच वाचण्यात आनंद देते, म्हणूनच मराठी हा माझा सर्वात आवडता विषय आहे.

माझा आवडता विषय मराठी यावर निबंध / Maza avadta vishay marathi nibandh in marathi.

शाळेत आम्हाला 6 विषय शिकवले जातात, परंतु त्यापैकी मराठी हा माझा अत्यंत आवडता विषय आहे. मराठी हा फक्त विषय नसून, तो आपल्या मातृभाषेशी असलेले एक गोड नाते आहे. लहानपणापासूनच मला मराठी साहित्याची ओढ लागली, त्यामुळे मराठीच्या धड्यांमधील गोष्टी, कविता वाचायला मला नेहमीच खूप आवडते.

शिक्षकांचा प्रेरणादायी प्रभाव

आमच्या शाळेत मराठी शिकवण्यासाठी सुभें सर आणि सध्या म्हस्के सर आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय मजेदार आणि समजण्यास सोपी आहे. प्रत्येक धड्याची प्रस्तावना देताना ते लेखकाची ओळख, त्याचे विचार याबद्दल खोलवर आम्हाला माहिती देतात, त्यामुळे धडा शिकताना खूप मज्जा येते. शिक्षकांचा शिकवण्याच्या पद्धतीमुळे मला मराठी विषयाची अधिक आवड निर्माण झाली आहे.

मराठीच्या विषयाने दिवसाची सुंदर सुरुवात

शाळेत सकाळच्या सत्रात सगळ्यात पहिला मराठीचा तास असतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात मराठीच्या गोष्टी आणि कवितांनी होते. हा विषय शिकल्यामुळे मला संपूर्ण दिवस आनंदी जातो. मराठीच्या तासात आम्ही गोष्टी, कविता, गद्य आणि विविध साहित्य प्रकारांचा अभ्यास करतो, ज्यामुळे माझी भाषा अधिक समृद्ध होते.

माझ्या घरातील लोकांचा मराठीवर प्रभाव

माझ्या घरातील लोकांना मराठी साहित्य आणि वाचनाची आवड असल्याने, मीही लहानपणापासून वाचनाचा छंद जोपासला आहे. माझे वडील आणि काका नेहमीच घरात पुस्तकं, मासिकं आणि वर्तमानपत्र वाचत असतात. त्यामुळे वाचनाची आवड आणि मराठी विषयाची गोडी घरातूनच माझ्यामध्ये रुजली आहे.

आपल्या जीवनातील मराठी भाषेचे विशेष स्थान

मराठी ही आपली मातृभाषा असल्याने ती मनाला खूप जवळची वाटते. मला मराठीतून संवाद साधताना मनःशांती मिळते. शाळेत मराठी निबंध, भाषण आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाल्याने मराठी भाषेच्या सखोल अभ्यासाची आवड वाढली आहे.

भविष्याचे स्वप्न

मराठी भाषेच्या प्रेमामुळे मला लेखक बनण्याची इच्छा आहे. अनेक महान लेखक आणि कवींच्या साहित्यातून विचारशक्ती वाढवण्याची प्रेरणा मिळते. मातृभाषा आपल्याला आत्मविश्वास देते आणि विचार व्यक्त करण्याचे साधन बनते.

निष्कर्ष

मराठी विषय हा माझ्यासाठी केवळ एक विषय नाही, तर ती एक आपली मातृभाषा भाषा आहे, जी मला आत्मविश्वास, ज्ञान आणि समज देते. त्यामुळे मराठी हा माझा आवडता विषय असून तो माझ्या आयुष्यात तो माझ्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव टाकतो.

माझा आवडता विषय मराठी निबंध 500 शब्द / Maza Avadta Vishay Nibandh In Marathi for class 8.

मराठी ही भाषा माझ्या हृदयाशी जोडलेली आहे. शाळेत मराठी शिकत आल्यामुळे तिचा अभ्यास केवळ शालेय गरज म्हणून नाही, तर माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आहे. मराठी विषय मला केवळ भाषेची गोडी देत नाही, तर एक सांस्कृतिक ओळखही प्रदान करते.

शिक्षकांकडून मिळणारी प्रेरणा

आमचे मराठी शिक्षक विषय शिकवताना प्रत्येक धड्यातील भावना समजावून सांगतात, ज्यामुळे मराठी शिकणे खूप सोपे आणि रोचक वाटते. त्यांची शिकवण्याची पद्धत मला भाषेच्या प्रत्येक पैलूची गोडी लावते, आणि त्यामुळे माझी मराठी भाषेवर पकड वाढली आहे.

घरातील वाचन संस्कृती

माझ्या घरी पेपर ,कांदबरी वाचनाची परंपरा असल्यामुळे मराठी साहित्याविषयीची आवड लहानपणापासूनच मला लागली आहे. घरी वडील वेगवेगळी पुस्तके वाचत असतात, त्यामुळे मला पुस्तके वाचायची आवड लागली. मराठीच्या प्रत्येक धड्याला समजून घेण्यात मला खूप मज्जा येते.

मराठी साहित्याची समृद्धी

मराठी साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील विविधता आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या ओवी साहित्य, तसेच पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर यांचे लेखन आणि नाट्यप्रकार यांनी मराठी साहित्य अधिक समृद्ध झाले आहे. त्यांच्या कृतींमुळे मराठी साहित्य शिकण्याची गोडी सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे.

महाराष्ट्राच्या परंपरांचा अभ्यास

मराठी शिकताना महाराष्ट्राच्या परंपरा, सण, चालीरीती यांचे रंजक ज्ञान मिळते. गणेशोत्सव,दिवाळी, नवरात्री यांसारख्या सणांचे महत्त्व समजते आणि या परंपरांचे आपल्या जीवनातील स्थान कळते. मराठी विषयाच्या अभ्यासातून आपली संस्कृती आणि लोकजीवन समजून घेण्यात मदत मिळते.

संवाद कौशल्याचा विकास

मराठी विषय शिकताना माझे बोलणे आणि लेखन कौशल्य सुधारत जात आहे. मराठी भाषेचा अभ्यास मला आत्मविश्वास देतो आणि मला विचार मांडण्याची क्षमता प्रदान करतो. मराठीच्या सखोल अभ्यासामुळे मी माझे विचार स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करू शकतो.

निष्कर्ष

मराठी हा केवळ एक विषय नसून, माझ्या जीवनातील संस्कृती आणि वारशाशी जोडणारा एक महत्त्वाचा धागा आहे. मराठीच्या अभ्यासातून मला आत्मविश्वास, संस्कृतीची जाण आणि अभिमान मिळतो, आणि त्यामुळे मराठी हा माझा अत्यंत आवडता विषय आहे.

माझा आवडता विषय मराठी निबंध लेखन / Majha Avadta Vishay Marathi Nibandh.

आमच्या शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विषयात मराठी हा माझा सर्वात आवडता विषय आहे. मराठी केवळ एक भाषा नसून ती आपली मातृभाषा आहे आणि आता राज्यभाषा देखील आहे, आणि यामुळे ती मला खूपच आवडते. लहानपणी आम्हाला शाळेत दरेकर सरांनी मराठी शिकवायला सुरुवात केली, ज्यामुळे या विषयात माझी अधिक गोडी निर्माण झाली.

शाळेतील मराठीचे महत्वाचे स्थान

सध्या मी आठवीत शिकत असून आमचे वर्गशिक्षक गायकवाड सर मराठी शिकवतात. ते धड्याची प्रस्तावना करत असताना लेखकाची ओळख सांगतात, त्यामुळे प्रत्येक धडा समजण्यात अधिक उत्सुकता जागृत होते. आमच्या शाळेत दिवसाची सुरुवात मराठी विषयाने होत असल्याने माझा दिवस चांगला जातो.

कुटुंबातील वाचनाची प्रेरणा

माझी आई आणि आजी हे नेहमीच वर्तमानपत्रं व पुस्तके वाचतात. त्यांच्यामुळे मला वाचनाची सवय लागली आहे, आणि त्यामुळे मराठी भाषा मला खूप सोपी व आवडती वाटते.

मराठी भाषेचे शालेय उपक्रम

शाळेत मराठी भाषेसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांसारख्या विविध उपक्रमांत मी नेहमीच भाग घेतो. घरी असतानाही कविता पाठांतर आणि गोष्टी वाचनाची आवड मला अधिकच मराठी विषयाशी जोडते.

मराठी साहित्याचे सौंदर्य

मराठी विषयामुळे मला कवितांचे, कथांचे आणि नाटकांचे विशेष आकर्षण वाटते. आमचे सर आम्हाला मराठी चांगले नाटके संगणक कक्षात दाखवतात. विविध लेखकांचे विचार आणि साहित्य माझ्यावर सकारात्मक प्रभाव टाकतात आणि मला अधिक विचारशील बनवतात.

निष्कर्ष

मराठी विषय मला सर्वात आवडता असून या माध्यमातून मला माझ्या मातृभाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान वाटतो. मराठी शिकताना मिळणारा आनंद माझ्या शालेय जीवनातील आठवणीत कायमच राहणार आहे.

Leave a Comment